'आर्यन खानसाठी मंत्रिमंडळ कामाला, ST कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येनंतरही फरक पडेना सरकारला'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2021 10:20 PM2021-10-29T22:20:25+5:302021-10-29T22:20:52+5:30
शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्यात येत आहेत, दुसरीकडे आरोग्य विभागाच्या परीक्षांमध्ये सातत्याने गोंधळ दिसून येतंय. आता एसटी कर्मचाऱ्यांच्याही तोंडाला पानं पुसण्याचं काम सुरू असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.
मुंबई - राज्यातील एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण, पगारवाढ, महागाई भत्ता वाढावा आदी मागण्यांसाठी ST कर्मचाऱ्यांकडून बेमुदत संप सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज सोलापुरात आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांची भेट घेतली. त्यावेळी, आमदार गोपीचंद पडळकर हेही उपस्थित होते. आमदार पडळकर यांनीही राज्य सरकावर टीका केली. एसटी महामंडळातील 28 कर्मचाऱ्यांनी आत्तापर्यंत आत्महत्या केली. पण, त्यांच्याकडे पाहायला सरकारमधील कुणालाही वेळ नसल्याचं पडळकरयांनी म्हटलं.
शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्यात येत आहेत, दुसरीकडे आरोग्य विभागाच्या परीक्षांमध्ये सातत्याने गोंधळ दिसून येतंय. आता एसटी कर्मचाऱ्यांच्याही तोंडाला पानं पुसण्याचं काम सुरू असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं. तर, गोपीचंद पडळकर यांनीही राज्य सरकावर हल्लाबोल केला. आतापर्यंत २८ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. पण, या सरकारला एसटी कर्मचाऱ्यांपेक्षा आर्यन खानची जास्त काळजी आहे, असा टोला पडळकर यांनी लगावला.
आत्तापर्यंत एकही मंत्री आत्महत्याग्रस्त कुटुंबाची भेट घेण्यासाठी गेलेला नाही पण दुसरीकडे आर्यन खानसाठी अख्ख मंत्रिमंडळ कामाला लागल्याची टीका पडळकर यांनी सरकारवर केली. जे राज्यसरकारच्या कर्मचाऱ्यांना तेच एसटी कर्मचाऱ्यांना’ द्या. पोलीस बळाचा वापर करू नका. अन्यथा एखाद्याने जीव गमावला तर त्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची असेल, असा इशाराच पडळकर यांनी दिला आहे.
नका.अन्यथा एखाद्याने जीव गमावला तर त्याची जबाबदारी मा.मुख्यमंत्र्यांची असेल. #UddhavThakre#CmoMaharashtra
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) October 29, 2021
दरम्यान, आज सकाळीच एका एसटी चालकाने बसगाडीच्या मागील शिडीला फाशी घेऊन आत्महत्या केली. या घटनेनं महाराष्ट्र सुन्न झाला आहे. एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी व्यथा आणि दयनीय अवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. सोलापूरमध्येही आज तेच चित्र पाहायला मिळालं. भाजप नेते चंद्रकांत पाटील सोलापूर दौऱ्यावर असताना काही कर्मचाऱ्यांना रडू कोसळलं. वाढती महागाई आणि नोकरीतून मिळणार कमी पगार, अनियमितता तसेच विविध समस्यांमुळे कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात अश्रू होते.