‘एलजीबीटी’ना कॅबचालकाची नोकरी

By Admin | Published: January 21, 2016 03:47 AM2016-01-21T03:47:50+5:302016-01-21T03:47:50+5:30

सिग्नलवर किंवा रेल्वेत भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या आणि समाजात उपेक्षित ठरणाऱ्या एलजीबीटी समुदायातील सदस्यांसमोर एका खासगी

'Cabot's job' to LGBT | ‘एलजीबीटी’ना कॅबचालकाची नोकरी

‘एलजीबीटी’ना कॅबचालकाची नोकरी

googlenewsNext

मुंबई : सिग्नलवर किंवा रेल्वेत भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या आणि समाजात उपेक्षित ठरणाऱ्या एलजीबीटी समुदायातील सदस्यांसमोर एका खासगी टॅक्सी सेवेने आशेचा किरण निर्माण केला आहे. वाहन चालवण्याचे प्रशिक्षण देऊन रेडिओ कॅब्स चालकाची नोकरी देऊन ही खासगी कंपनी एलजीबीटी समुहातील लोकांना रोजगार देणार आहे. हमसफर ट्रस्टच्या सहकार्याने ही खासगी टॅक्सी सेवा देणारी कंपनी हा प्रकल्प मुंबईसह देशात राबवणार आहे, अशी माहिती हमसफर ट्रस्टचे कार्यक्रम संचालक पल्लव पाटणकर यांनी बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
पाटणकर म्हणाले की, सध्या पाच सदस्यांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू आहे. कंपनीला सुमारे १ हजार ५०० सदस्यांची गरज आहे. सुरूवातीला मिळणारा प्रतिसाद पाहून लवकरच हा प्रकल्प देशात राबवण्याचा मानसही कंपनीने व्यक्त केला आहे. कॉर्पोरेट जगतामधील इतर कंपन्यांनीही या प्रकल्पाचा कित्ता गिरवावा, असे आवाहन पाटणकर यांनी केले आहे.या प्रकल्पात एलजीबीटी समुदायातील सदस्यांना वाहन चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाईल. सोबतच त्यांचा शिकाऊ परवाना आणि वाहन चालक परवानाही काढला जाईल. त्यासाठी लागणारा खर्च हमसफर ट्रस्ट आणि कंपनी करणार आहे. प्रशिक्षणानंतर किमान एका व्यक्तीला १२ ते १५ हजार रुपयांची कमाई करता येईल, असा विश्वास अरुण खरात यांनी व्यक्त केला.

Web Title: 'Cabot's job' to LGBT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.