Join us

थर्टीफर्स्टसाठी केक्स, चॉकलेट्सची पर्वणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 8:04 AM

काही तासांवर नवीन वर्षाचे आगमन होत असून मुंबईकर उल्हासित दिसून येत आहेत. बाजारात नवनवीन आलेल्या गोष्टींकडे ग्राहक आकर्षित होत आहेत. यात सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे केक आणि चॉकलेट्स. ‘३१ डिसेंबर’ व नवीन वर्षाच्या आगमनासाठी व भेटवस्तू देण्यासाठी नवीन प्रकारचे केक व चॉकलेट्स खरेदीचा ओघ वाढताना दिसून येत आहे.

मुंबई : काही तासांवर नवीन वर्षाचे आगमन होत असून मुंबईकर उल्हासित दिसून येत आहेत. बाजारात नवनवीन आलेल्या गोष्टींकडे ग्राहक आकर्षित होत आहेत. यात सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे केक आणि चॉकलेट्स. ‘३१ डिसेंबर’ व नवीन वर्षाच्या आगमनासाठी व भेटवस्तू देण्यासाठी नवीन प्रकारचे केक व चॉकलेट्स खरेदीचा ओघ वाढताना दिसून येत आहे.नवीन वर्षामध्ये गोडवा कायम राहावा, यासाठी भेटवस्तू म्हणून चॉकलेटचा वापर करण्यात येतो. सेलीब्रेशनसाठी केकचा वापर केला जात आहे. मुंबईमध्ये दादर, क्राफर्ड मार्केट, मशीद बंदर, गिरगाव, वरळी, कुर्ला, चेंबूर येथील बाजारात नवनवीन प्र्रकारचे चॉकलेट व केक आले आहेत. बाजारात कॅडबरी, फेरेरो, मार्कस्, लोटस, कँडीमॅन अशा प्रकारचे देशी चॉकलेट्सचे ब्रँड तसेच चॉकलेटचे आंतरराष्ट्रीय ब्रँडदेखील बाजारात उपलब्ध आहेत. पूर्वी डार्क चॉकलेट व व्हाइट चॉकलेट्सवर प्रक्रिया करून नवीन चॉकलेट निर्माण केले जात. आता अनेक फ्लेवर्सचे चॉकलेट उपलब्ध आहेत. चॉकलेट कव्हर फु्रट, चॉकलेट डॉल, हॉट रेड चिल्ली चॉकलेट, स्पायसी चॉकलेट, थीम चॉकलेट, फेस्टिव्हल चॉकलेट, फु्रट स्टफ चॉकलेट बाजारात दिसून येत आहेत.लिकस चॉकलेट व केक ग्राहकांच्या पसंतीचे ठरलेले असून यात रम, वोडका, अल्कोहोल यांचे ठरावीक मिश्रण करण्यात येते. तसेच केकमध्ये थीम केकचा ट्रेंड आला असून ज्या प्रकारचा सोहळा असेल त्या प्रकारचे केक बाजारात उपलब्ध केले जातात.मॅरेज केक, सेलीब्रेशन केक, हॅपी न्यू ईअर केक असे प्रकार यात येतात. शुगर फ्री केक, डाएट केक, अ‍ॅडल्ट केक, जेली केक, ग्रॅव्हिटी केक, कंपनी लोगो केक, हँगिंग केक, झुंबर केक अशा प्रकारचे केक बाजारात उपलब्ध असून त्यांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.तरुणाईचा उत्साह मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतो. त्यामुळे तरुणाई विविध हॉटेल्स, पब, समुद्रकिनारी जाऊन नवीन वर्षाचे सेलीब्रेशन करते. सर्व जण केक, चॉकलेट व पार्टीचे साहित्य घेऊन नवीन वर्षाचे स्वागत करतात.अबालवृद्धांपासून चॉकलेटला सर्वांची पसंती असल्यामुळे त्याला मोठ्या प्रमाणात मागणी असते. ख्रिसमसच्या सणानिमित्ताने चॉकलेटच्या फ्लेवर्सच्या प्रकारात बदल केला जात असून त्यात नवनवीन चवी बनवण्यात येतात. कॅनबेरी, स्ट्रॉबेरी कॅरेमल, आॅरेंज असे प्रकार बाजारात उपलब्ध आहेत.- नीलम बोरा, ब्रँडगुरूप्रत्येक वेळी केक व चॉकलेटच्या प्रकारामध्ये नावीन्य दिसून येते. प्रत्येक जण विविध प्रकारच्या कल्पना लढवून चविष्ट केक व चॉकलेट तयार करतात. तरुणाईच्या पसंतीस पडतील अशा प्रकारचे ब्रँड तयार करण्यासाठी प्रचंड मेहनत लागते. आजकाल सर्वजण प्रत्येक सोहळ्यात केक कापतात. चॉकलेट गिफ्ट देतात. यात सतत बदल अपेक्षित आहे. ड्रायफ्रुट्स, क्रीमचा वापर करून केक व चॉकलेट्स तयार केले जातात.- जान्हवी राऊळ, ब्रँडगुरूबाजारात केक व चॉकलेटची किंमत आकार, सजावटीनुसार, त्यात किती पदार्थ ड्रायफ्रुट समाविष्ट करण्यात आलेले आहेत यावर ठरते. चांगल्या दर्जाचे केक व चॉकलेटची किंमत एक हजार रुपयांपासून सुरू होते. 

टॅग्स :मुंबई