कोलकाताची ब्रिटिशकालीन स्मृतिचित्रे उलगडली!, छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात विशेष प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 02:35 AM2017-10-23T02:35:23+5:302017-10-23T02:35:27+5:30

मुंबईप्रमाणेच देशातील प्रमुख शहरांना वैशिष्ट्यपूर्ण इतिहासाची जोड मिळाली आहे. त्यामुळे शहरातील इतिहासाच्या पाऊलखुणांना भेट देण्याची संधी फार दुर्मीळ असते.

Calcutta's British Memorial Libraries Exhibit!, Special exhibition at Chhatrapati Shivaji Maharaj Museum | कोलकाताची ब्रिटिशकालीन स्मृतिचित्रे उलगडली!, छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात विशेष प्रदर्शन

कोलकाताची ब्रिटिशकालीन स्मृतिचित्रे उलगडली!, छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात विशेष प्रदर्शन

Next

मुंबई : मुंबईप्रमाणेच देशातील प्रमुख शहरांना वैशिष्ट्यपूर्ण इतिहासाची जोड मिळाली आहे. त्यामुळे शहरातील इतिहासाच्या पाऊलखुणांना भेट देण्याची संधी फार दुर्मीळ असते. मात्र नुकतेच कुलाबा येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाने एका वेगळ्या धाटणीच्या प्रदर्शनातून कोलकाता शहराच्या इतिहासाशी ऋणानुबंध जोडणारे अनोखे प्रदर्शन आयोजित केले आहे.
कोलकाता १८ व्या आणि १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात ‘महालांचे शहर’ म्हणून ओळखले जात होते. कोलकाता लंडननंतर इंग्रजी साम्राज्याचे दुसरे मुख्य शहर बनले. इ.स. १७७३ पर्यंत कोलकाता इंग्रज भारताची राजधानी बनली तसेच ते साम्रज्याच्या शक्तीचे प्रदर्शन करणाºया
बºयाच सार्वजनिक इमारतींचे केंद्र बनले.
या ब्रिटिशकालीन कोलकाता शहराची स्मृतिचित्रे ‘कोलकाता वसाहतकालीन दृष्टिक्षेप’ या प्रदर्शनातून छत्रपती शिवाजी
महाराज वस्तुसंग्रहालयमध्ये प्रिंट्स अ‍ॅण्ड ड्रॉइंग गॅलरी येथे मांडण्यात आली आहेत.
फिरोजा गोदरेज आणि पॉलिन यांनी हे प्रदर्शन क्युरेट केले आहे. १८०० शतकातील या प्रिंट्सचा संग्रह आहे. या प्रिंट्स गतकाळातील कोलकाता शहराच्या वैभवाची आठवण करून देतात. हे प्रदर्शन या कलादालनात कलारसिकांसाठी वर्षभर सुरू राहणार आहे.
>‘कोलकाता वसाहतकालीन दृष्टिक्षेप’ हे प्रदर्शन १८व्या आणि १९व्या शतकातील प्रमुख इंग्रजी भूदृश्य चित्रकारांनी रेखाटलेल्या चित्रांतील विकासशील कोलकाता शहर आणि तिची संस्कृती दर्शविते. या दालनात विषयगत संमिश्र प्रिंट्स बघायला मिळतात. या प्रदर्शनात सेंट जॉर्ज चर्च, जुने कोर्ट हाउस, हुगळी नदीकडून दिसणारे कोलकाता शहर, चांदपाल घाट आदी कोलकाता शहरातील ठिकाणांचा समावेश आहे.

Web Title: Calcutta's British Memorial Libraries Exhibit!, Special exhibition at Chhatrapati Shivaji Maharaj Museum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.