राज्यातील परिचारिकांची आंदोलनाची हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:08 AM2021-06-16T04:08:09+5:302021-06-16T04:08:09+5:30

राज्यातील परिचारिकांची आंदोलनाची हाक मुख्यमंत्र्यांना पाठविले पत्र लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यातील सरकारी रुग्णालयात परिचारिकांनी २१ जूनपासून आंदोलनाची ...

Call for agitation of nurses in the state | राज्यातील परिचारिकांची आंदोलनाची हाक

राज्यातील परिचारिकांची आंदोलनाची हाक

Next

राज्यातील परिचारिकांची आंदोलनाची हाक

मुख्यमंत्र्यांना पाठविले पत्र

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यातील सरकारी रुग्णालयात परिचारिकांनी २१ जूनपासून आंदोलनाची हाक दिली आहे. पदभरती, पदोन्नती, कोविड भत्ता, रजा आणि इतर अन्य प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करणार आहेत. त्यानुसार दोन दिवस दोन तास काम बंद, दोन दिवस पूर्ण दिवस काम बंद, तर या आंदोलनानंतर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर २५ जूनपासून बेमुदत आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने दिला आहे. या मागण्यांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र पाठविले आहे.

राज्यात सरकारी रुग्णालयात परिचारिकांची संख्या कमी आहे. अनेक वर्षे रिक्त पदे भरली न गेल्याने ही संख्या कमी असून, सद्या सेवेत असलेल्या परिचारिकांवर कामाचा ताण आहे. कोरोना काळात हा ताण प्रचंड वाढला आहे. त्यामुळे रिक्त पदे भरावी आणि पदोन्नती द्यावी, अशी मुख्य मागणी परिचारिकांची आहे. कोविड भत्ता वाढवावा, केंद्र सरकारप्रमाणे कोविड भत्ता द्यावा, अशी दुसरी मागणी आहे. त्याचबरोबर कोरोना काळात सात दिवस काम आणि तीन दिवस सुट्टी द्यावी, शिल्लक रजेचा प्रश्न आणि अन्य मागण्या या संघटनेच्या आहेत. या मागण्यांसाठी संघटना कित्येक महिने विविध माध्यमातून आंदोलन करीत आहेत.

* बेमुदत संपाचा इशारा

प्रलंबित मागण्यांसाठी परिचारिका आंदोलन करीत आहेत. दरम्यान, सर्व स्तरावर पाठपुरावाही सुरू आहे. मात्र, या मागण्या काही मान्य होताना दिसत नाहीत. त्यामुळे परिचारिकांमध्ये नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर सरकारला जागे करण्यासाठी परिचारिकांनी पुन्हा आंदोलनाची हाक दिली आहे. त्यानुसार २१- २२ जूनला दोन तास, २३-२४ जूनला पूर्ण दिवस आणि २५ जूनपासून बेमुदत संप त्यांनी पुकारला आहे. कोरोना काळात राज्यभरातील परिचारिका संपावर गेल्या तर त्याचा मोठा फटका आरोग्य यंत्रणेला बसणार आहे.

................................

Web Title: Call for agitation of nurses in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.