‘फ्री झालात की मग कॉल करा’!
By Admin | Published: August 23, 2014 01:30 AM2014-08-23T01:30:22+5:302014-08-23T01:30:22+5:30
प्रवाशांच्या तक्रारी सोडवण्यासाठी कोकण रेल्वेने नुकतीच एसएमएस हेल्पलाइन सेवा सुरू केली.
मुंबई : प्रवाशांच्या तक्रारी सोडवण्यासाठी कोकण रेल्वेने नुकतीच एसएमएस हेल्पलाइन सेवा सुरू केली. मात्र प्रवाशांच्या तक्रारींसाठी असणा:या या हेल्पलाइनवर सूचना आणि चौकशींचे एसएमएस तसेच फोन येत आहेत. काही ‘टाइमपास’ करणा:या प्रवाशांनी तर कहरच केला असून, या हेल्पलाइनवर फोन केल्यानंतर कोकण रेल्वेकडून प्रतिसाद न मिळताच ‘फ्री झालात की कॉल करा’ असे एसएमएसही सोडले आहेत. त्यामुळे अशा एसएमएसने कोकण रेल्वेचे कर्मचारी त्रस्त झाले आहेत.
खानपाण सेवा आणि टॉयलेटची व्यवस्था बरोबर नसणो, डब्यांमध्ये अस्वच्छता, फेरीवाले, तृतीयपंथीयांकडून त्रस होणो या आणि अनेक कारणांमुळे प्रवाशांचा प्रवास त्रसदायक होत असतो. प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. याबाबत प्रवाशांच्या अनेक तक्रारी असतात. प्रवाशांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी 15 ऑगस्टपासून मोबाइल एसएमएस सेवा सुरू केली आहे. यासाठी 9004470700 हा नंबर कोकण रेल्वेकडून प्रवाशांना उपलब्ध करण्यात आला आहे. आतार्पयत या हेल्पलाइन नंबरवर 51 एसएमएस आले आहेत. यात फक्त 1क् ते 12 एसएमएस हे तक्रारींचे होते. स्वच्छता, पाण्याची आणि प्रसाधनगृहांची व्यवस्था नीट नसल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. तसेच अपंगांच्या डब्यात अन्य प्रवाशांचा शिरकाव, महिला प्रवाशांना होत असलेल्या समस्यांच्या तक्रारी एसएमएसद्वारे केल्या आहेत. तर अन्य एसएमएस चौकशी आणि सूचनांचे असल्याचे कोकण रेल्वेकडून सांगण्यात आले. महत्त्वाची बाब म्हणजे काही प्रवाशांनी ही एसएमएस हेल्पलाइन सेवा असूनही त्यावर कॉल केले आहेत. कोकण रेल्वेकडून मात्र कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने अशा प्रवाशांनी ‘फ्री झालात की कॉल करा’ असे एसएमएस पाठवले. (प्रतिनिधी)
च्याबाबत कोकण रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी वैशाली पतंगे यांनी सांगितले की, एसएमएस हेल्पलाइन सेवा असूनही त्यावर काही प्रवासी कॉल करीत आहेत.
च्प्रतिसाद मिळत नसल्याने प्रवाशांकडून अर्थहीन एसएमएस पाठवले जात आहेत. काही प्रवाशांना प्रवासात ख:याखु:या समस्या आल्यामुळे
त्यांच्याकडून एसएमएस करण्यात आले आणि त्यांच्या समस्या सोडवण्यातही आल्या.
15 ऑगस्ट रोजी 70104 कारवार-मडगाव पॅसेंजर ट्रेनमधून अर्धागवायू झालेला एक प्रवासी प्रवास करीत होता. ही ट्रेन अप दिशेला असनोटी स्थानकात 3 नंबर प्लॅटफॉर्मवर जाणार होती. मात्र अर्धागवायू असलेल्या प्रवाशाने एसएमएस करून ही ट्रेन 1 नंबर प्लॅटफॉर्मवर नेण्याची विनंती केली.
त्या प्रवाशाची विनंती मान्य करीत ट्रेन 1 नंबर प्लॅटफॉर्मला नेण्यात आली. ही ट्रेन कधीकधी 1 नंबर तर कधी 3 नंबर प्लॅटफॉर्मला जाते. त्याचा अंदाज घेत या प्रवाशाने ही विनंती केली.