लेबर कँपमध्ये १० ते २० जण बॉम्ब बनवत असल्याचा कॉल; कॉलर निघाला मद्यपी
By मनीषा म्हात्रे | Published: September 18, 2023 08:38 PM2023-09-18T20:38:16+5:302023-09-18T20:38:26+5:30
मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात पहाटे पावणे चारच्या सुमारास कस्तुरबा मार्ग येथील लेबर कँप परिसरात २० ते २५ जण बॉम्ब तयार करत असल्याचा कॉल नियंत्रण कक्षात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत गणेशोत्सवाची लगबग सुरू असतानाच, लेबर कँपमध्ये १० ते २० जण बॉम्ब बनवत असल्याचा कॉलने खळबळ उडाली. चौकशीत कॉल करणारा मद्यपी निघाला. नशेतच त्याने कॉल केल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.
मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात पहाटे पावणे चारच्या सुमारास कस्तुरबा मार्ग येथील लेबर कँप परिसरात २० ते २५ जण बॉम्ब तयार करत असल्याचा कॉल नियंत्रण कक्षात आला. त्यानुसार, पोलिसांनी तात्काळ संपूर्ण परिसर पिंजून काढला. मात्र, त्यात काहीही मिळून आले नाही. अखेर, हा कॉल खोटा असल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी कॉल धारकाचा शोध सुरू केला. पोलिसांनी एका मद्यपीला ताब्यात घेत चौकशी केली. तेव्हा, त्यानेच वादातून कॉल केल्याचे समोर आले. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहे.
गेल्या पाच महिन्यात ८० हून अधिक कॉल...
मुंबई पोलिसांना गेल्या पाच महिन्यांत ८० हून अधिक खोटी माहिती देणारे अथवा धमकीचे कॉल आले आहेत.
यापूर्वीचे कॉल
- मुख्यमंत्र्यांशी बोलणे व्हावे म्हणून धमकी...
यापूर्वी मंत्रालयात बॅाम्ब ठेवल्याचा निनावी दूरध्वनी ११२ क्रमांकाच्या हेल्पलाईनला आला होता. निनावी दूरध्वनी करून आरोपीने मंत्रालय उडवून देण्याची धमकी दिली. निनावी दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने मुख्यमंत्र्यांशी बोलण्याची इच्छा केली व्यक्त केली. त्यांच्याशी बोलू दिले नाही तर बॅाम्बने मंत्रालय उडवून देण्याची दिली धमकी दिली. याप्रकरणी पाथर्डी येथून एका संशयीताला स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
...
- दक्षिण मुंबईतील एका महिलेने ३८ वेळा दूरध्वनी करून पोलिसांना त्रास दिला होता.