मुंबई- शेतक-यांच्या प्रश्नावरून शेतकरी हक्क परिषदेचे नेते अजित नवले आक्रमक झाले आहेत. केंद्र व राज्य सरकारने एक अधिवेशन फक्त शेतकऱ्यांसाठी घेतलेच पाहिजे, या मागणीसाठी २९ व ३० नोव्हेंबर रोजी देशभरातील १०८ संघटना दिल्लीत संसदेला घेराव घालतील, असे डॉ. नवले यांनी जाहीर केले. वाय. बी. चव्हाण सेंटर येथे किसान सभेने आयोजित शेतकरी हक्क परिषदेत ते बोलत होते.अखिल भारतीय किसान परिषद सभा आणि तिचे सगळे सदस्य, पदाधिकारी विद्यमान भाजप शिवसेना सरकार पाडण्यासाठी निर्धारपूर्वक काम करेल, अशी भूमिका सभेचे माजी राज्य अध्यक्ष आ. जे. पी. गावित यांनी मांडली. काबाडकष्ट करून जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावावर जमिनी करतो असे फक्त आश्वासन दिले.मात्र या जमिनी धनदांडग्या उद्योगपतींना देण्याचा डाव या सरकारने आखला आहे, सरसकट कर्जमाफी करतो, असे सांगून नंतर 16 अटी शर्थी टाकून शेतकऱ्यांना धोका देण्याचे काम या सरकारने केले. भाजपाने आम्हा गरिबांना लुटून बुलेट ट्रेन, समृद्धी मार्ग केला जातोय, त्यातून बड्या लोकांचे खिसे भरण्याचे काम करून आमचा विश्वासघात केलाय, अशी टीका राज्य सरचिटणीस अजित नवले यांनी केली.
"शेतकऱ्यांसाठी संसद अन् विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवा, अन्यथा..."
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 8:20 PM