Join us

वाहतूक पोलिसांना आलटून पालटून कामावर बोलवा, कामाचा ताण वाढतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 12:22 AM

वाहतूक विभागात कर्मचाऱ्यांची संख्या १०० टक्के न ठेवता ५० टक्के ठेवावी.

मुंबई : देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे लॉकडाउन घोषित करण्यात आले आहे. खासगी आणि सार्वजनिक वाहतूक बंद आहे. अशा स्थितीतही सर्व वाहतूक पोलिसांना कर्तव्यावर बोलविण्यात येत आहे. कोरोनाचा धोका पाहता त्यांना आलटून पालटून कामावर बोलविण्यात यावे, अशी मागणी वाहतूक पोलिसांनी केली आहे.वाहतूक विभागात कर्मचाऱ्यांची संख्या १०० टक्के न ठेवता ५० टक्के ठेवावी. कर्मचाऱ्यांची दोन पथकात विभागणी करून कर्मचाºयांना आलटून पालटून कामाला बोलविण्यात यावे. त्यामुळे एका पथकाला आज तर एका पथकाला उद्या अशा प्रकारे कर्तव्यावर बोलविण्यात यावे, असे वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे.याबाबत एक वाहतूक पोलीस म्हणाला, नाकाबंदीत वाहतूक पोलिसांचा नागरिकांशी जवळून संबंध येतो. रस्त्यावर वाहतूक कमी असून ५० टक्के वाहतूक पोलीस नसतील तरीही चालेल अशी स्थिती आहे. मात्र १०० टक्के वाहतूक पोलिसांना उभे राहावे लागत आहे. कोरोनाचा धोका पाहता पोलिसांना आलटून पालटून बोलविल्यास दिलासा मिळेल.>वाहतुकीची सोय नाहीमी डोंबिवलीला राहतो. परंतु येताना ठाणे, नवी मुंबई लागते. दुचाकीवर दोन पोलीस असतील तरी त्यांना परवानगी नाही. चारचाकी वाहनात दोन जण जाऊ शकतात. त्यामुळे आम्हाला बसने यावे लागते. तीन ठिकाणी गाड्या बदलाव्या लागतात. डोंबिवली ते चेंबूर प्रवासाला तीन-साडेतीन तास लागतात, असे एका पोलिसाने सांगितले.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या