मनीषा म्हात्रे, मुंबई : गेल्या वर्षभरात लोहमार्ग पोलिसांच्या दप्तरी १५ हजार ६७७ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यापैकी ४१ टक्के गुन्ह्यांची उकल करत ३० टक्के मालमत्ता जप्त करण्यात आली. सेंट्रल लाईनवर सर्वाधिक १० हजार गुन्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. दुसरीकडे, गैरप्रकार रोखण्यासाठी फलाटावर तपासणी अधिकाऱ्यांच्या शर्टावर कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.
लोहमार्ग पोलिसांच्या आकडेवारीनुसार, २०१९ च्या तुलनेत २०२३ मध्ये दाखल गुन्ह्यांचा आलेख ५४ टक्क्यांनी कमी झाला आहे. गेल्यावर्षी चोरीच्या सर्वाधिक १५ हजार १६ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. सर्वाधिक १० हजार ११ गुन्हे हे सेंट्रल लाईनवर असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. वेस्टर्न लाईनवर ५ हजार ६६६ गुन्हे नोंद आहेत. तपासणीच्या बहाण्याने प्रवाशांकडून पैसे उकळल्याच्या काही तक्रारी समोर आल्या. हा गैरप्रकार तसेच भ्रष्टाचार रोखण्यासाठी कारवाई सीसीटीव्हीच्या खालीच करण्याच्या सूचना रेल्वे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिल्या. आता तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कॅमेरे बसविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. जेणेकरून तपासणीच्या वेळी त्यांच्या शर्टावर असलेल्या कॅमेऱ्यामध्ये सर्व कारवाई कैद होईल. कुठल्याही प्रवाशाला विनाकारण त्रास नको? म्हणून आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे.
गुन्ह्यांचे प्रकार गुन्हे उकलहत्या ८ ८ हत्येचा प्रयत्न ०४ ०४जबरी चोरी ३१० २६४फसवणूक ४२ २४बलात्कार ०६ ०६ विनयभंग ७८ ७६ दंगल ०७ ०६
ऑनलाइनच्या काळातही पाकीटमारी जाेरात सुरू : ऑनलाईनच्या काळातही मुंबईकरांच्या पाकीटावर सर्वाधिक डल्ला मारल्याचे आकडेवारीतून समोर येत आहे. यामध्ये सोनसाखळी चोरी (५९), घड्याळ (६), पाकीटमारी (९५०५), पाकिटाला कट (१८), बॅग ओढणे (१२४८) तसेच अन्य चोरी (४१७८) गुन्ह्यांचा समावेश आहे.
कुर्ल्यात सर्वाधिक गुन्हे : कुर्ला रेल्वे पोलिस ठाण्यात सर्वाधिक २१०० गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापैकी ६०५ गुन्ह्यांचा उलगडा करण्यात आला आहे. त्यापाठोपाठ कल्याण (१८६९), तर ठाणे (१५६३) यांचा क्रमांक लागतो.
क्यू आर कोडचा धाक : प्रत्येक तक्रारीची तत्काळ दखल घेत त्याचा निपटारा करण्यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून प्रत्येक पोलिस ठाण्यात क्यू आर कोड सिस्टीम सुरू करण्यात आली आहे. क्यू आर कोडद्वारे कोणी तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ केल्यास त्याबाबतचा प्रतिसाद तक्रारदार नोंदवू शकतात.
यावर्षी गेल्या दोन महिन्यांत एकूण ६८४ जणांनी यावर प्रतिसाद दिला. यामध्ये तुम्हाला पोलिसांकडून कसे सहकार्य मिळाले? किती वेळात तक्रार नोंदवून घेतली? असा स्वरूपांच्या प्रश्नाचा समावेश आहे. यामध्ये ज्या ठिकाणी तक्रारदाराला वाईट अनुभव आला अशा पोलिसांवर तत्काळ कारवाई करण्यात येत असल्याचे रेल्वे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी सांगितले.
२०२९ च्या तुलनेत ५४ टक्के गुन्हे कमी : २०१९ च्या तुलनेत ५४ टक्के कमी झाले आहे. २०१९ मध्ये एकूण ३३८२० गुन्हे नोंद झाले होते. त्यापैकी ५१०२ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे.
पोलिस ठाणे गुन्हे उकल रेट जप्त टक्केवारी एसीपी सीएसएमटी ४३२७ १६८३ ३९ ३२एसीपी कल्याण ३८६० १६१७ ४२ २७ एसीपी हार्बर १८२४ ७६३ ४२ ३० डीसीपी सेंट्रल १००११ ४०६३ ४१ ३० डीसीपी वेस्टर्न ५६६६ २४३१ ४१ ३०