अवैैध वाहतुकीविरोधात मोहीम

By admin | Published: July 28, 2014 12:41 AM2014-07-28T00:41:58+5:302014-07-28T00:41:58+5:30

खाजगी बसेसमधून अवैध प्रवाशांची ने- आण करणाऱ्या खाजगी वाहनांवर उपप्रादेशिक परिवहन मंडळाने कारवाईचा बडगा उगारला आहे

Campaign against illegal transportation | अवैैध वाहतुकीविरोधात मोहीम

अवैैध वाहतुकीविरोधात मोहीम

Next

पूनम गुरव, नवी मुंबई
खाजगी बसेसमधून अवैध प्रवाशांची ने- आण करणाऱ्या खाजगी वाहनांवर उपप्रादेशिक परिवहन मंडळाने कारवाईचा बडगा उगारला आहे. या अंतर्गत गेल्या ७ महिन्यात तब्बल ३५ बसेस आणि ५९ तीन आणि चार चाकी वाहनांवर कारवाई करून सुमारे सहा लाखाचा दंड वसूल केला आहे.
ठाणे- बेलापूर आणि सायन पनवेल महामार्गावर खाजगी वाहनांची आणि प्रवाशांची मोठ्याप्रमाणात वर्दळ असते. प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी ठिकठिकाणी बस थांबे उभारले आहेत. मात्र याठिकाणी एसटी, एनएमएमटी किंवा बेस्ट बसेस ऐवजी खाजगी वाहने उभी असल्याचे दिसते. शासनाच्या तिकीटापेक्षा हे खाजगी वाहनचालक एक - दोन रूपये कमी घेतात तसेच गर्दीही कमी असल्यामुळे प्रवाशीही सरकारच्या बसेसऐवजी खाजगी बसेसने प्रवास करताना दिसत आहेत.
अशा खाजगी बसेसमधून प्रवाशांची वाहतूक करणे कायद्याने गुन्हा आहे. तसेच खाजगी बसेसमध्ये याअगोदर महिलांवरील अत्याचारांच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशी खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांविरोधात आरटीओने कारवाईची मोहिम हाती घेतली आहे.

Web Title: Campaign against illegal transportation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.