‘एक चम्मच कम’ मुंबई महापालिकेची मोहीम, मुंबईकरांच्या स्वास्थ्यासाठी आरोग्य विभागाचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 05:18 AM2018-06-16T05:18:50+5:302018-06-16T05:18:50+5:30

बदलती जीवनशैली आणि चुकीच्या आहार पद्धतीमुळे असंसर्गजन्य आजारांचा धोका वाढला आहे. यामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा, अस्थमा हे आजार तरुण पिढीमध्ये आढळून येत आहेत. याविषयीच जनजागृती करण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाने आणि अमर गांधी फाउंडेशनने संयुक्तपणे एक चम्मच कम’ ही मोहीम हाती घेतली आहे.

campaign of Mumbai Municipal Corporation, Health Department's initiative for the health of the people of Mumbai | ‘एक चम्मच कम’ मुंबई महापालिकेची मोहीम, मुंबईकरांच्या स्वास्थ्यासाठी आरोग्य विभागाचा पुढाकार

‘एक चम्मच कम’ मुंबई महापालिकेची मोहीम, मुंबईकरांच्या स्वास्थ्यासाठी आरोग्य विभागाचा पुढाकार

Next

मुंबई : बदलती जीवनशैली आणि चुकीच्या आहार पद्धतीमुळे असंसर्गजन्य आजारांचा धोका वाढला आहे. यामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह,
लठ्ठपणा, अस्थमा हे आजार तरुण पिढीमध्ये आढळून येत आहेत. याविषयीच जनजागृती करण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाने आणि अमर गांधी फाउंडेशनने संयुक्तपणे एक चम्मच कम’ ही मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून आपल्या दैनंदिन आहारात तेल, साखर आणि मिठाचा एक चमचा कमी वापर करावा, असा संदेश देण्यात येणार आहे.
या मोहिमेकरिता चित्रपट दिग्दर्शक फरहान अख्तर जनजागृतीसाठी साहाय्य करणार आहे. या मोहिमेची जनजागृती बस, होर्डिंग्स,
रेल्वे स्थानकावरील बोर्ड्सवर संदेश आणि माहितीपर फलक लावून करण्यात येणार आहे, अशी माहिती पालिका आयुक्त अजय मेहता यांनी दिली. ते म्हणाले की, या माध्यमातून आपल्या दैनंदिन आयुष्यातील आहाराचा समतोल आणि व्यायामाचे महत्त्वही अधोरेखित करण्यात येणार आहे. अमर गांधी फाउंडेशनचे डॉ. भूपेंद्र गांधी यांनी याविषयी सांगितले की, या मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येकाने
स्वत:पासून सुरुवात केली पाहिजे. मीठ, साखर असो वा तेल याचे प्रमाण अधिक असल्यास, हृदय आणि रक्तावर घातक परिणाम होतात.
त्यामुळे अनेकानेक प्रकारचे आजार जडतात.
जागतिक आरोग्य संघटनेच्या  अहवालानुसार, देशातील ६१ टक्के नागरिकांना असंसर्गजन्य रोग होत असल्याचे आढळले आहे. त्यातील
हृदयविकाराशी संबंधित ४५ टक्के असून, त्यानंतर २२ टक्के श्वसन रोग, १२ टक्के कर्करोग आणि ३ टक्के मधुमेहाचे रुग्ण असल्याचे दिसून आले  आहे. 



आहारातून प्रतिबंध♦जागतिक आरोग्य संघटनेच्या
अहवालानुसार, देशातील ६१
टक्के नागरिकांना असंसर्गजन्य
रोग होत असल्याचे आढळले
आहे. या सगळ्या आजारांना
आहाराच्या माध्यमातून प्रतिबंध
करता येतो, त्यामुळे या
मोहिमेतून सामान्यांमध्ये ही
जनजागृती करण्यात येणार आहे.


 

Web Title: campaign of Mumbai Municipal Corporation, Health Department's initiative for the health of the people of Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.