Join us

‘एक चम्मच कम’ मुंबई महापालिकेची मोहीम, मुंबईकरांच्या स्वास्थ्यासाठी आरोग्य विभागाचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 5:18 AM

बदलती जीवनशैली आणि चुकीच्या आहार पद्धतीमुळे असंसर्गजन्य आजारांचा धोका वाढला आहे. यामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह,लठ्ठपणा, अस्थमा हे आजार तरुण पिढीमध्ये आढळून येत आहेत. याविषयीच जनजागृती करण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाने आणि अमर गांधी फाउंडेशनने संयुक्तपणे एक चम्मच कम’ ही मोहीम हाती घेतली आहे.

मुंबई : बदलती जीवनशैली आणि चुकीच्या आहार पद्धतीमुळे असंसर्गजन्य आजारांचा धोका वाढला आहे. यामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह,लठ्ठपणा, अस्थमा हे आजार तरुण पिढीमध्ये आढळून येत आहेत. याविषयीच जनजागृती करण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाने आणि अमर गांधी फाउंडेशनने संयुक्तपणे एक चम्मच कम’ ही मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून आपल्या दैनंदिन आहारात तेल, साखर आणि मिठाचा एक चमचा कमी वापर करावा, असा संदेश देण्यात येणार आहे.या मोहिमेकरिता चित्रपट दिग्दर्शक फरहान अख्तर जनजागृतीसाठी साहाय्य करणार आहे. या मोहिमेची जनजागृती बस, होर्डिंग्स,रेल्वे स्थानकावरील बोर्ड्सवर संदेश आणि माहितीपर फलक लावून करण्यात येणार आहे, अशी माहिती पालिका आयुक्त अजय मेहता यांनी दिली. ते म्हणाले की, या माध्यमातून आपल्या दैनंदिन आयुष्यातील आहाराचा समतोल आणि व्यायामाचे महत्त्वही अधोरेखित करण्यात येणार आहे. अमर गांधी फाउंडेशनचे डॉ. भूपेंद्र गांधी यांनी याविषयी सांगितले की, या मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येकानेस्वत:पासून सुरुवात केली पाहिजे. मीठ, साखर असो वा तेल याचे प्रमाण अधिक असल्यास, हृदय आणि रक्तावर घातक परिणाम होतात.त्यामुळे अनेकानेक प्रकारचे आजार जडतात.जागतिक आरोग्य संघटनेच्या  अहवालानुसार, देशातील ६१ टक्के नागरिकांना असंसर्गजन्य रोग होत असल्याचे आढळले आहे. त्यातीलहृदयविकाराशी संबंधित ४५ टक्के असून, त्यानंतर २२ टक्के श्वसन रोग, १२ टक्के कर्करोग आणि ३ टक्के मधुमेहाचे रुग्ण असल्याचे दिसून आले  आहे. आहारातून प्रतिबंध♦जागतिक आरोग्य संघटनेच्याअहवालानुसार, देशातील ६१टक्के नागरिकांना असंसर्गजन्यरोग होत असल्याचे आढळलेआहे. या सगळ्या आजारांनाआहाराच्या माध्यमातून प्रतिबंधकरता येतो, त्यामुळे यामोहिमेतून सामान्यांमध्ये हीजनजागृती करण्यात येणार आहे. 

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाआरोग्य