बावखळी वाचविण्यासाठी मोहीम

By admin | Published: May 26, 2014 04:50 AM2014-05-26T04:50:51+5:302014-05-26T04:50:51+5:30

नायगाव वसईतील नष्ट होणार्‍या बावखळी पर्यावरणात मोलाची भर टाकणार्‍या असून ही नैसर्गिक संपत्ती वाचविण्यासाठी वसईत खर्‍या अर्थाने सुरूवात झाली

Campaign to save the bottle | बावखळी वाचविण्यासाठी मोहीम

बावखळी वाचविण्यासाठी मोहीम

Next

अमर म्हात्रे, नायगाव वसईतील नष्ट होणार्‍या बावखळी पर्यावरणात मोलाची भर टाकणार्‍या असून ही नैसर्गिक संपत्ती वाचविण्यासाठी वसईत खर्‍या अर्थाने सुरूवात झाली असून त्यांची पश्चिम वसईत सागरशेत भागातील तारभाट येथे स्थानिकांनी श्रमदानाने स्वच्छता केली. शासकीय सहाय्य नाही, स्थानिकांचे सहकार्य नाही, त्यातच अशा बावखळीस कचराकुंडीचे स्वरुप आल्याने पुढाकार घ्यावा तरी कोणी अशा संभ्रमावस्थेत येथील गावातील नागरीक स्वत:हून स्वच्छतेसाठी उतरले. वसईत जवळपास अशी २०० बावखळी आहेत. काळओघात ती नष्ट झाली. ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ हा दृष्टीकोन ठेवून पोर्तुगीजकाळात गोड्या पाण्याची साठवण करण्यासाठी त्यांची निर्मिती झाली. पुढे मत्स्य पालनासाठी त्याचा उपयोग होऊ लागला. बावखळींना वाचविण्यासाठी सोशल नेटवर्किंगसह विविध माध्यमातून जनजागृती व्हायला लागली आहे.

Web Title: Campaign to save the bottle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.