Join us

माथेरानमध्ये हातरिक्षा, घोडे पुन्हा सेवेत रुजू होऊ शकतात का? - उच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 5:13 AM

माथेरानमध्ये जीवनावश्यक वस्तू पुरविण्यासाठी टेम्पोला परवानगी देण्याचे उच्च न्यायालयाने निर्देश देऊनही त्याचे पालन करण्यात न आल्याने न्यायालयाने राज्य सरकारकडे वरील विचारणा केली.

मुंबई : माथेरानमध्ये हातरिक्षा, घोडे पुन्हा सेवेत रुजू होऊ शकतात का? अशी विचारणा उच्च न्यायल्याने राज्य सरकारकडे केली. माथेरानमध्ये जीवनावश्यक वस्तू पुरविण्यासाठी टेम्पोला परवानगी देण्याचे उच्च न्यायालयाने निर्देश देऊनही त्याचे पालन करण्यात न आल्याने न्यायालयाने राज्य सरकारकडे वरील विचारणा केली.उच्च न्यायालयाने २ जून रोजी माथेरानसह आजूबाजूच्या गावांना जीवनावश्यक वस्तू पुरविण्यासाठी टेम्पोचा वापर करण्याची परवानगी द्या, असे निर्देश देऊनही त्याचे पालन करण्यात आले नाही. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.माथेरानचे माजी आमदार सुरेश लाड यांनी येथील रहिवाशांना लॉकडाऊनमुळे जीवनावश्यक वस्तू उपलब्ध होत नसल्याने त्यांना टेम्पोने सामान ने-आण करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी जनहित याचिकेद्वारे केली आहे. या याचिकेवर न्या. अनिल मेनन यांच्यापुढे सुनावणी होती. ‘समिती सदस्यांना प्रत्यक्षात भेटून बैठक घेणे शक्य नसेल तर त्यांनी निदान व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घ्यावी,’ असे न्या. मेनन यांनी म्हटले. तर रेल्वेच्या वकिलांनी माथेरानच्या रेल्वेचे वेळापत्रक सर्वांच्या सोयीने करता येणे शक्य आहे का, याची पडताळणी करू, असे न्यायालयाला सांगितले.>पुढील सुनावणी होणार आजलॉकडाऊन नसल्याने माथेरानमध्ये घोडे आणि हातरिक्षा सुरू झाल्याची माहिती सरकारी वकिलांनी न्यायालयाला दिली. त्यावर याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी आक्षेप घेतला. पर्यटक नसल्याने हातरिक्षा बंद आहेत, असे वकिलांनी सांगितले. न्यायालयाने याबाबत सरकारी वकिलांना सूचना घेण्याचे निर्देश देत याचिकेवर २३ जून रोजी सुनावणी ठेवली.