समुद्राचे पाणी पिण्यास वापरू शकतो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:06 AM2021-09-13T04:06:29+5:302021-09-13T04:06:29+5:30
सचिन लुंगसे लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : आपण पाण्याचा दोन वेळा वापर केला पाहिजे. पाण्यावर प्रक्रिया केली पाहिजे. समुद्राचे ...
सचिन लुंगसे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आपण पाण्याचा दोन वेळा वापर केला पाहिजे. पाण्यावर प्रक्रिया केली पाहिजे. समुद्राचे पाणी आपण नक्कीच वापरू शकतो. समुद्राचे पाणी वापरण्यापूर्वी त्यातील क्षार काढावे लागतात. मग ते पाणी आपण आपल्या इतर गोष्टींसाठी वापरू शकतो. समुद्रातील पाण्यावर प्रक्रिया करताना हे आर्थिकदृष्ट्या थोडे खर्चिक आहे. मात्र आपण जर का थोडे कौशल्य वापरले तर नक्कीच आपण त्याचा फायदेशीर वापर करू शकतो. याशिवाय आपण भूगर्भातील पाण्याचा देखील वापरू शकतो, असे मत नवी दिल्ली येथील इस्रायलच्या वाणिज्य दूतावासाचे जल अधिकारी डॉ. लिओर असाफ यांनी व्यक्त केले.
पाण्याचा स्तर कमी होत आहे; काय आव्हाने आहेत ?
भूगर्भातील पाण्याचा स्तर कमी होत आहे. अनेक आव्हाने आहेत. यावर उपाय काय तर आपण पाणी वाचविले पाहिजे. कारण आपण जर पाहिले तर मान्सून कमी झाला आहे. दुष्काळाचे प्रमाण वाढले आहे. म्हणून आपण पाणी वाचविले पाहिजे. पाण्यावर प्रक्रिया करत ते वापरले पाहिजे. पाणी वाया जाता कामा नये. अन्यथा त्याचे वाईट परिणाम होतील. आपण नागरिकांना जलसाक्षर केले पाहिजे. पाणी वाचविण्यासाठी आवाहन केले पाहिजे. जल क्षमतेसाठी प्रोत्साहित केले पाहिजे. अशी कामे नागरी आणि सरकारी अशा दोन्ही पातळ्यांवर झाली पाहिजेत.
जागतिक तापमानवाढीचा फटका बसतो आहे ?
जागतिक तापमानवाढीचा आपणा सगळ्यांना फटका बसतो आहे. जागतिक तापमान वाढत आहे. त्याचे परिणाम आपणाला दिसत आहेत. पाणी ही लोकांची संपत्ती आहे. तिलाही जपले पाहिजे. पाणी ही काळाची गरज आहे. आपण पाण्याचा दोन वेळा वापर केला पाहिजे. भूगर्भातील पाण्याचा स्तर कमी होत आहे. अनेक आव्हाने आहेत. यांवर उपाय काय, तर आपण पाणी वाचविले पाहिजे. कारण आपण जर पाहिले तर मान्सून कमी झाला आहे. दुष्काळाचे प्रमाण वाढले आहे. म्हणून आपण जलस्रोतांची क्षमतावृद्धी करत, धोरणात्मक निर्णय घेत जल व्यवस्थापन केले पाहिजे.
पाणी कसे वापरायचे?
लोकांचा राहणीमानाचा दर्जा उंचावताना आपण जलस्रोतांच्या संवर्धनावर भर दिला पाहिजे. जलव्यवस्थापन ही आता काळाची गरज आहे. आपण आपले जलस्रोत वाढविले पाहिजेत. नव्याने धोरणे आखली पाहिजेत. कायद्याची अंमलबजावणी केली पाहिजे आणि या माध्यमातून जलसंवर्धन करत पाण्यासाठी जनजागृती देखील केली पाहिजे. पाणी कसे वापरायचे ? याचे नियम सांगतानाच याबाबत पुरेशी जनजागृती केली पाहिजे. पाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी पुन्हा वापरता आले पाहिजे. म्हणजे पाणी दोन वेळा वापरता आले पाहिजे. पाणी ही लोकांची संपत्ती आहे. तिला पण जपले पाहिजे. जमिनीतील गळती म्हणजे भूगर्भात जलवाहिन्यांच्याद्वारे जे पाणी वाया जात आहे, अशा गळत्या शोधल्या पाहिजेत. त्यांचे विश्लेषण केले पाहिजे.
शहरी भागात जलव्यवस्थापन कसे केले पाहिजे ?
पाण्याची मागणी, पाण्याचे व्यवस्थापन आणि जलस्रोतांचे व्यवस्थापन केले पाहिजे. जलधोरणात सुधारणा केली पाहिजे. उद्योग आणि शेतीसाठी दीर्घकालीन अशा शाश्वत जलस्रोतांचा विकास केला पाहिजे. शहरी भागात जलव्यवस्थापन अवश्य केले पाहिजे आणि प्रकल्पांसाठी धोरण आखले पाहिजे. मुंबईसारखी शहरे असोत किंवा इतर कोणती शहरे; प्रत्येकाला पाणी मिळाले पाहिजे. भूगर्भातील पाण्याचा वापर नियोजन करीत केला पाहिजे. जलस्रोतांची क्षमतावृद्धी झाली पाहिजे आणि धोरणात्मक निर्णय घेत जलव्यवस्थापन केले पाहिजे.