'संशयित आरोपींचे डॉक्टरकीचे लायसन्स रद्द करा'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 06:16 AM2019-05-30T06:16:51+5:302019-05-30T06:17:02+5:30

पायल तडवी आत्महत्येप्रकरणी संशयित तिन्ही आरोपी महिला डॉक्टरांचे लायसन्स रद्द करा, अशी मागणी मनविसेने महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे केली आहे. बु

Cancel the doctor's license for suspected accused | 'संशयित आरोपींचे डॉक्टरकीचे लायसन्स रद्द करा'

'संशयित आरोपींचे डॉक्टरकीचे लायसन्स रद्द करा'

Next

मुंबई : पायल तडवी आत्महत्येप्रकरणी संशयित तिन्ही आरोपी महिला डॉक्टरांचे लायसन्स रद्द करा, अशी मागणी मनविसेने महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे केली आहे. बुधवारी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांनी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे रजिस्टार अजय देशमुख यांची भेट घेत, या तिन्ही आरोपींच्या डॉक्टरकीचे लायसन्स रद्द करा, अशी मागणी केली.
बुधवारी, डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे रजिस्टार अजय देशमुख यांनी मनविसेच्या मागण्या ऐकून घेतल्या आहेत. याविषयी अधिक माहिती देताना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांनी सांगितले की, एमएमसीकडे या प्रकरणी पत्र देण्यात आले असून, पत्रात त्या तिन्ही डॉक्टरांचा परवाना रद्द करावा, अशी मागणी केली गेली आहे. एमएमसीने आमची मागणी मान्य न केल्यास मनविसेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली.
या प्रकरणासंदर्भात महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल लवकरच बैठक घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईत किंवा राज्यात पुन्हा असे प्रकार घडू नयेत आणि असे प्रकार करणाऱ्यांना अद्दल घडावी, यासाठी मानविसेतर्फे नायर रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांची ही भेट त्यांनी घेतली असल्याची माहिती त्यांनी दिली.

Web Title: Cancel the doctor's license for suspected accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.