‘नाणार’ जीवसृष्टीच्या रक्षणासाठी रद्द करा, गिरीश राऊत यांंचे मत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2018 06:40 AM2018-09-30T06:40:01+5:302018-09-30T06:40:30+5:30

हरितद्रव्य जोपासणारे पृथ्वीवरील कोकणासारखे प्रदेश जोपासणे गरजेचे

 Cancel Nanaar 'for the protection of life, view of Girish Raut | ‘नाणार’ जीवसृष्टीच्या रक्षणासाठी रद्द करा, गिरीश राऊत यांंचे मत

‘नाणार’ जीवसृष्टीच्या रक्षणासाठी रद्द करा, गिरीश राऊत यांंचे मत

Next

मुंबई : नाणार रिफायनरी ही केवळ कोकण नव्हे, तर पूर्ण मानवजात व जीवसृष्टीच्या रक्षणासाठी रद्द होणे आवश्यक आहे. कार्बन उत्सर्जन शून्य करून, कार्बन शोषणारे हरितद्रव्य जोपासणारे पृथ्वीवरील कोकणासारखे प्रदेश हे येऊ घातलेल्या पिढ्यांसाठी जपणे अत्यंत आवश्यक आहे, असे
मत भारतीय जीवन व पर्यावरण चळवळीचे निमंत्रक गिरीश राऊत यांनी व्यक्त केले.

सरकारने नाणार रिफायनरीबाबत तज्ज्ञांची समिती नेमली. ही समिती सहा महिन्यांत अहवाल देणार असे समजते. या पार्श्वभूमीवर गिरीश राऊत बोलत होते. ते म्हणाले, कोकणची परिस्थिती आणि नैसर्गिक समृद्धी याबाबत प्रकल्पग्रस्तांनी सर्व पातळ्यांवर माहिती दिली. आहे. आंबा, काजू, फणस, कोकम, सुपारी, नारळ, उत्कृष्ट शेती आणि आजही बऱ्याच प्रमाणात शुद्ध असलेला आणि मासळीने भरलेला समुद्र अशी कोकणची स्थिती आहे. मुंबईत माहुलला अशी स्थिती रिफायनरी येण्यापूर्वी होती. रिफायनरी आल्यानंतर ती उरली नाही, हे संशोधकांनी माहुलला जाऊन समजून घ्यावे.
माहुलचे मूळचे शेतकरी, मच्छीमार आणि त्यांची गावे उद्ध्वस्त झाली, हे या सशोधकांनी पाहावे. काळी पडलेली खाडी, निर्जिव समुद्र आणि जळालेली खारफुटी त्यांनी पाहावी. माहुलचे मूळ रहिवासी आणि नंतर तेथे आणलेले प्रकल्पबाधित नरक यातना भोगत आहेत. या भागांत विविध आजारांचे थैमान तर आहेतच, पण स्त्रियांना महिन्यातून तीन वेळा मासिक पाळी येण्यासारख्या व्याधींना सामोरे जावे लागत आहे. रिफायनरी आणि तिच्या संलग्न रासायनिक उद्योगांमुळे, शहरीकरणामुळे मूळ गावांची संस्कृती संपलेली आहे. त्यांना मासे पकडण्यासाठी आता पार रत्नागिरीपर्यंत म्हणजे प्रस्तावित नाणार रिफायनरीच्या परिसरापर्यंत जावे लागते. ज्या शहरीकरणाचे कौतुक केले जाते, ज्याचे मुंबई हे अत्युच्च शिखर आहे. त्या मुंबईतील सर्व नद्या, खाड्या व समुद्र हे औद्योगिकरण व शहरीकरणामुळे मृत आहेत.

रिफायनरीचे दुष्परिणाम
च्रिफायनरी प्रकल्पामुळे आम्लयुक्त पाऊस (अ‍ॅसिड रेन) पडतो. त्यामुळे कोकणची शेती आणि बागायती जळून जाईल.
च्रिफायनरी प्रकल्प येणार ही माहिती आधीच असल्यामुळे नाणार परिसरातील जमिनी परप्रांतीयांनी प्रकल्प येण्यापूर्वी खरेदी केल्या आहेत.

च्जनतेचा प्रकल्पास विरोध आहे. तो वैयक्तिकरीत्या, ग्रामसभांचे ठराव, जमीनमोजणी रद्द करविणे, सभा, मोर्चे, विधानसभेपुढे धरणे या रूपाने व्यक्त झाला आहे.
च्चक्रीवादळे हे तेल (पेट्रोल, डिझेल इ.) जाळल्यामुळे होणाºया तापमानवाढीचे परिणाम आहेत. याला रिफायनरी कारणीभूत आहेत.

Web Title:  Cancel Nanaar 'for the protection of life, view of Girish Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.