Join us

शिक्षकांना लावलेले प्रशिक्षण तातडीने रद्द करा, शिक्षक सेनेची शिक्षण मंत्र्यांकडे मागणी

By मनोहर कुंभेजकर | Published: February 25, 2024 7:58 PM

...त्यामुळे बारावी व दहावी बोर्डाच्या परीक्षा सुरळीत पार पडाव्यात यासाठी शिवसेना शिक्षक सेनेचे नेते शिवाजी शेंडगे यांनी आमदार प्रकाश सुर्वे यांच्यामार्फत शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे मुख्याध्यापक शिक्षकांची ही कैफियत मांडली.

 मुंबई- सध्या बारावी व दहावी बोर्डाच्या परीक्षा सुरू असून सदर परीक्षा सुरळीत पार पडाव्यात यासाठी सर्व मुख्याध्यापक शिक्षक झटत असतानाच शिक्षण विभागाने दि, 26, 27 व 28 फेब्रुवारी असे तीन दिवसाचे प्रशिक्षण शिक्षकांसाठी आयोजित केले आहे. या प्रशिक्षणात शिक्षकांनी हजर राहण्याचे आदेश काढले आहेत. परंतू जर शिक्षक प्रशिक्षणाला उपस्थित राहिले तर बारावी व दहावी बोर्डाच्या परीक्षा कोणी घ्यायच्या वर्गावर पर्यवेक्षक म्हणून कोणी उभे राहायचे असे मोठे प्रश्न अनेक शाळा व ज्युनिअर कॉलेजच्या मुख्याध्यापक शिक्षकांना पडले आहेत.

 त्यामुळे बारावी व दहावी बोर्डाच्या परीक्षा सुरळीत पार पडाव्यात यासाठी शिवसेना शिक्षक सेनेचे नेते शिवाजी शेंडगे यांनी आमदार प्रकाश सुर्वे यांच्यामार्फत शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे मुख्याध्यापक शिक्षकांची ही कैफियत मांडली. आमदार  सुर्वे यांनी सिंधुदुर्ग दौऱ्यावर असलेल्या शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क करून त्यांना याबाबत अवगत केले. 

सदर प्रशिक्षण तातडीने रद्द होऊन शिक्षकांचे प्रशिक्षण बारावी व दहावी बोर्डाच्या परीक्षा झाल्यानंतर आयोजित करावे असे निवेदन त्यांनी दिले आहे.शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी याबाबत तातडीने शिक्षण आयुक्तांशी बोलून मार्ग काढतो असे सांगितल्याची माहिती शेडगे यांनी दिली.  

टॅग्स :दीपक केसरकर शिक्षक