...त्यांचा ठेका रद्द करा

By Admin | Published: December 3, 2014 11:45 PM2014-12-03T23:45:05+5:302014-12-03T23:45:05+5:30

मुदतीत काम न करणाऱ्या ठेकेदारांचा ठेका रद्द करा,असे आदेश कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महापौर कल्याणी पाटील यांनी मंगळवारी दिले.

... cancel their contract | ...त्यांचा ठेका रद्द करा

...त्यांचा ठेका रद्द करा

googlenewsNext

कल्याण : मुदतीत काम न करणाऱ्या ठेकेदारांचा ठेका रद्द करा,असे आदेश कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महापौर कल्याणी पाटील यांनी मंगळवारी दिले. बेसिक सर्व्हिस फॉर अर्बन पुअर अर्थात बीएसयूपी योजनेंतर्गत बांधण्यात येत असलेल्या घरकुलांच्या कामांचा पाटील यांनी आढावा घेतला. यात कामांमध्ये दिरंगाई झाल्याचे निदर्शनास आले.
केडीएमसी क्षेत्रात २००७ पासून बीएसयूपी योजनेंतर्गत घरे बांधण्याचे काम सुरू आहे. या योजनेंतर्गत ८ हजार १८८ घरे बांधण्यात येणार आहेत. या कामांमध्ये घोटाळा झाल्याच्या आरोपांमुळे बहुतांश ठिकाणी प्रकल्प पूर्णत्त्वास येऊनही घरांचा ताबा मिळालेला नाही. (प्रतिनिधी)

Web Title: ... cancel their contract

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.