डोंबिवली : रेल्वे प्रवासासाठी काढण्यात येणारा मासिक पास (एमएसटी) पास पहिल्यांदाच काढतांना प्रवाशाने रेल्वेच्या फॉर्मवर दिलेला पत्ता रेल्वेच्या सुरक्षा यंणत्रेला चुकीचा आढळून आल्यास अशा प्रवाशाचा पास रद्दबातल होऊ शकतो असे रेल्वे बोर्ड दिल्लीने नुकतेच जाहिर केले आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाच्या निर्देशानुसार हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
प्रवाशांना पास काढतांना सुरुवातीलाच एक आयकार्ड दिले जाते, त्यावेळी संबंधित प्रवाशाचे नाव, घरचा पत्ता, वय आणि सही आदी माहितीही त्यामध्ये नमूद केली जाते, तसेच त्यानुसार देण्यात आलेल्या आयकार्डच्या क्रमांकासह त्या प्रवाशाने कधी पास काढले आहेत याच्यासह त्याची अन्य वैयक्तिक माहितीची नोंद ठेवण्यात येत असल्याचे सूत्रंनी सांगितले.
जर फॉर्ममध्ये भरुन दिलेला पत्ता कायमस्वरुपी तोच असेल तर सातत्याने पास काढतांना तो देण्याची आवश्यकता नसते.
अनेकदा घर बदलल्याने अथवा अन्य कारणांमुळे संबंधित फॉर्ममध्ये दिलेल्या पत्त्यात बदल होतात. याबाबतची माहिती रेल्वेला देणो अनावधानाने अथवा जाणीव होऊनही राहून जाते. अशावेळी पत्ता बदलूनही त्याची माहिती न दिल्याची बाब रेल्वेच्या सुरक्षा यंत्रणोच्या निदर्शनास आली तर मात्र संबंधितांचा पास रद्द करण्याचे हक्क संबंधित रेल्वे प्रशासनाला असल्याची स्पष्ट सूचना रेल्वे बोर्डाने दिली आहे.
त्यानूसार मुंबईतील मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या संबंधित विभागांनाही सूचित करण्यात आले आहे.
याबाबत पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शरत चंद्रायन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही या वृत्तास दुजोरा देत अशा आशयाचे आदेश/सूचना बोर्डाकडून आल्याचे त्यांनीही स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
4अनेकदा घर बदलल्याने अथवा अन्य कारणांमुळे फॉर्ममध्ये दिलेल्या पत्त्यात बदल होतात. याबाबतची माहिती रेल्वेला देणो अनावधानाने अथवा जाणीव होऊनही राहून जाते. अशावेळी संबंधितांचा पास रद्द करण्याचे हक्क रेल्वेला आहे.