मुंबई : महापालिका प्रशासनाच्या सूचनेनुसार बेस्ट उपक्रमाने तयार केलेल्या कृती आराखड्यावर लवकरच अंमल होणार आहे. आर्थिक संकाटात असलेल्या बेस्टने बचतीसाठी सर्व योजना, विविध सवलती व कर्मचा-यांचे भत्ते यांनाही कात्री लावली आहे. त्यानुसार बेस्ट उपक्रमामधील तब्बल ४,८९४ पदे रद्द करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने बेस्ट समातीच्या मंजुरीसाठी पाठविला आहे.बेस्टने सन २०१७-१८चा ५६० कोटी तर सन २०१८-१९चा ८९० कोटी रुपये तुटीचा अर्थसंकल्प सादर केला आहे. आर्थिक मदत मिळण्याची मागणी बेस्टने पालक संस्था असलेल्या मुंबई महापालिकेकडे मदत मागितली आहे. मात्र बेस्टमध्ये आर्थिक सुधारणा करण्याच्या अटीवर ही मदत बेस्ट उपक्रमाला करण्यात येणार आहे. त्यानुसार कामगारांचे भत्ते गोठवणे, रिक्त पदे न भरणे, बेस्ट ताफा आणि प्रवाशांच्या भाड्यात सुधारणा केली जाणार आहे. आस्थापना खर्च कमी करण्यासाठी बेस्ट प्रशासनाने सुरक्षा व दक्षता विभागातील १७९, स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील ७९, विद्युत पुरवठा विभागातील ३९४, परिवहन अभियांत्रिकी विभागातील ८७५ तर वाहतूक विभागातील ३३६७ पदे रद्द करण्याचे ठरविले आहे. यामध्ये बसचालकांची १५९५, वाहकांची १६५७, स्वचकांची ३००, मॅकेनिकची ३०८, जोडारी १५३, नवघाणी २५० पदांचा समावेश आहे.बसेसचा ताफाही होणार कमीएकेकाळी बसचा ताफा ४४५० होता. सध्या ३५०० बसचा ताफा आहे. हा ताफा आणखी कमी करून ३३००च्या आसपास आणला जाणार आहे.बेस्टमध्ये भाडेतत्त्वावर बसगाड्या घेतल्या जाणार आहेत. यामुळे बेस्टमधील अधिकारी आणि कामगारांची ४,८९४ पदे रद्द केली जाणार आहेत.
बेस्टमधील ४८९४ पदे रद्द, भत्त्यांमध्ये कपात केल्यानंतर नोकरीही धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 2:55 AM