मागील १५ दिवसात ७ लाख प्रवाशांचे तिकीट रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 07:02 PM2020-04-16T19:02:48+5:302020-04-16T19:03:28+5:30

मागील १५ दिवसात ७ लाखाहून अधिक प्रवाशांचे तिकीट रद्द केले असून प्रवाशांना ५३ कोटींचा परतावा दिला आहे.

Cancellation of 7 lakh passenger tickets in last 15 days | मागील १५ दिवसात ७ लाख प्रवाशांचे तिकीट रद्द

मागील १५ दिवसात ७ लाख प्रवाशांचे तिकीट रद्द

Next

५३ कोटींचा तिकीट परतावा

मुंबई : उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त प्रवाशांनी दोन-तीन महिन्याअगोदर प्रवाशांकडून रेल्वेचे तिकीट काढले जाते. मात्र कोरोनामुळे एक्सप्रेस बंद झाल्या आहेत. परिणामी, पश्चिम रेल्वे प्रशासन रेल्वेचे तिकीट रद्द करत आहे. मागील १५ दिवसात ७ लाखाहून अधिक प्रवाशांचे तिकीट रद्द केले असून प्रवाशांना ५३ कोटींचा परतावा दिला आहे.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मार्गावरील लांब पल्यांच्या गाड्या बंद करण्यात आल्या आहेत. एक्सप्रेस सेवा उपलब्ध नसल्याने प्रवाशांनी काढलेल्या तिकिटांचा परतावा पश्चिम रेल्वेकडून दिला जात आहे.  १  मार्च ते १५ एप्रिलपर्यंत पश्चिम रेल्वेच्या संपूर्ण विभागातून एकूण ७ लाख  १२ हजार प्रवाशांना ५३ कोटी ४७ लाख रुपयांचा तिकीट परतावा केला आहे.

कोरोना विषाणूमुळे सर्वत्र बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. याचा थेट परिणाम अर्थव्यवस्थेवर होत आहे. लॉकडाऊनमुळे रेल्वे सेवा बंद आहे. परिणामी पश्चिम रेल्वेच्या तिजोरीवर फटका बसत आहे. रेल्वे प्रशासनाच्या  प्रवासी वाहतुकीतून मिळणारे आणि इतर माध्यमातून मिळणारा महसूल सुद्धा बुडत आहे.१ मार्च ते ३१ मार्च  कालावधीत २० लाख ९६ हजार प्रवाशांचा प्रवास रद्द झाला आहे. परिणामी पश्चिम रेल्वेने या प्रवाशांना १३२ कोटी २५ लाख रुपयांचा तिकीट परतावा दिला आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्याकडून देण्यात आली.
---------------------------

४२७ कोटीचे नुकसान
कोरोना विषाणूमुळे देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहेत. त्यामुळे रेल्वे सेवा बंद आहे. परिणामी पश्चिम रेल्वेच्या मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहेत. १ मार्च ते १५ एप्रिलपर्यंत सुमारे ४२७ कोटीचे नुकसान पश्चिम रेल्वेला सोसावे लागले आहे.
---------------------------

Web Title: Cancellation of 7 lakh passenger tickets in last 15 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.