‘नोटा रद्द केल्याने फार फरक पडणार नाही’

By admin | Published: November 15, 2016 04:23 AM2016-11-15T04:23:15+5:302016-11-15T04:23:15+5:30

शासनाने ५०० व १ हजारांच्या जुन्या नोटा चलनातून रद्द केल्याने देशभरात सर्वाचीच धावपळ सुरू आहे. काळ्या पैशांवर आळा घालण्यासाठी व हा पैसा जवळ बाळगणाऱ्यांना

'Cancellation of notes will not make much difference' | ‘नोटा रद्द केल्याने फार फरक पडणार नाही’

‘नोटा रद्द केल्याने फार फरक पडणार नाही’

Next

पनवेल : शासनाने ५०० व १ हजारांच्या जुन्या नोटा चलनातून रद्द केल्याने देशभरात सर्वाचीच धावपळ सुरू आहे. काळ्या पैशांवर आळा घालण्यासाठी व हा पैसा जवळ बाळगणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी मोदी सरकारने हा निर्णय घेतला आहे. मात्र, या नोटांवर बंदी घालून जास्त काय साध्य होईल असे मला वाटत नाही, अशी प्रतिक्रि या महात्मा गांधी यांचे वंशज तुषार गांधी यांनी खारघर येथे एका कार्यक्र मात दिली.
युवा सेंटर येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘चॅलेन्जेस टू इंडियन डायव्हर्सिटी बातचित’ या कायक्रमात ते बोलत होते. काळा पैसावाल्यांनी आपला पैसा यापूर्वीच प्रॉपर्टी, ज्वेलरीमध्ये गुंतविला असल्याने त्यांना जास्त काही फरक पडणार नाही. यापूर्वी मोरारजी देसार्इंनी अशाप्रकारचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यातून काय साध्य झाले नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. देशभरात धर्मवादावर त्यांनी झोड उठवली. आपल्या देशात अनेक समस्या आहेत त्यांच्यावर चर्चा होणे गरजेचे असताना हिंदू-मुस्लीम भेदाभेद जाणीवपूर्वक निर्माण केला जातो. देशात मिठाची कमतरता असल्याची अफवा पसरवली जाते आणि अनेक जण त्याला बळी पडतात. गणपती दूध पितो या अफवेला अनेक जण बळी पडतात तर मिठाच्या अफवेचं काय? असा टोलाही त्यांनी लगावला. देशात नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे. ते भारताचाच भाग असून पाकिस्तानात राहत नाही. भारत सरकारबाबत त्यांच्या मनात प्रचंड नाराजी आहे, असे गांधी यांनी सांगितले. मी फाशीच्या शिक्षेच्या विरोधात असून कोणत्याही गुन्हेगाराला फाशी देण्याच्या मी विरोधात असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)

Web Title: 'Cancellation of notes will not make much difference'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.