एटीव्हीएमवरून काढलेले तिकीट रद्द करता येणार

By admin | Published: February 23, 2016 01:19 AM2016-02-23T01:19:39+5:302016-02-23T01:19:39+5:30

एटीव्हीएमवरून काढलेले अनारक्षित ट्रेनचे तिकीट आता तिकीट खिडक्यांवरही रद्द करता येणे शक्य होणार आहे. रेल्वेच्या क्रिस संस्थेकडून अशा प्रकारची सुविधा देण्यात येत असून, मध्य आणि पश्चिम

Cancellation of ticket drawn from ATVM can be canceled | एटीव्हीएमवरून काढलेले तिकीट रद्द करता येणार

एटीव्हीएमवरून काढलेले तिकीट रद्द करता येणार

Next

मुंबई : एटीव्हीएमवरून काढलेले अनारक्षित ट्रेनचे तिकीट आता तिकीट खिडक्यांवरही रद्द करता येणे शक्य होणार आहे. रेल्वेच्या क्रिस संस्थेकडून अशा प्रकारची सुविधा देण्यात येत असून, मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून त्याची लवकरच अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती क्रिसच्या (सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टिम) अधिकाऱ्यानी दिली.
उपनगरीय लोकलबरोबरच एटीव्हीएम मशिनवर लांब पल्ल्याच्या अनारक्षित ट्रेनच्या तिकिटाची सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे. एटीव्हीएमवरून अनारक्षित तिकीट काढल्यानंतर ते तिकीट रद्द करण्याची सुविधा मात्र प्रवाशांना नव्हती. त्यामुळे प्रवाशांना भुर्दंड बसत होता. आता मात्र असे तिकीट रद्द करण्याबाबतची प्रक्रिया पार पाडण्यात आली असून, मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या तिकीट खिडक्यांवरील (यूटीएस यंत्रणा) यंत्रणेतही त्याप्रमाणे बदल करण्यात आला आहे. अनारक्षित तिकीट रद्द करण्यासाठी ३0 रुपये शुल्क आकारले जाईल आणि हे शुल्क तिकिटांच्या रकमेतूनच वजा होईल, अशी माहिती क्रिसकडून देण्यात आली. लवकरच या सुविधेची अंमलबजावणी होणार आहे. (प्रतिनिधी)

प्रवाशांना असुविधाच
तिकीट रद्द करण्याचे
शुल्क हे ३0 रुपये असल्याने उपनगरीय लोकल प्रवाशांना तिकीट रद्द करता येणे
शक्य नाही.

मोबाइल तिकिटांतील अडथळा दूर होणार : पेपरलेस मोबाइल तिकीट सेवेतील अडथळा दूर करण्यासाठी क्रिसकडून डायनामिक जीपीएस प्रणालीचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे नेटवर्क चांगल्या प्रकारे मिळेल आणि तिकीट काढणे शक्य होईल.

एटीव्हीएमवर काढलेले लोकलचे आणि अनारक्षित तिकीट रेल्वे खिडक्यांवरही रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव मध्य आणि पश्चिम रेल्वेला पाठविण्यात आला आहे; तसेच खिडक्यांवरील तिकीट यंत्रणेत बदल करण्यात आला आहे.
- उदय बोभाटे (क्रिस महाव्यवस्थापक, मुंबई विभाग)

Web Title: Cancellation of ticket drawn from ATVM can be canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.