७ उमेदवार निरक्षर : ५६८ पैकी फक्त १२८ उमेदवारच पदवीधर, ३०१ अल्पशिक्षितनामदेव मोरे ल्ल नवी मुंबईमहापालिका निवडणुकीमध्ये उमेदवार निश्चित करताना सर्वच राजकीय पक्षांनी पैसे व वशिलेबाजीच्या तुलनेत शिक्षणाला दुय्यम स्थान दिले आहे. ५६८ उमेदवारांपैकी तब्बल ३०१ उमेदवार अल्पशिक्षित आहेत. फक्त १२८ जण पदवीधर असून ७ उमेदवार चक्क निरक्षर असल्याचे स्पष्ट झाले आहे. नवी मुंबई हे सुनियोजित व हायटेक शहर आहे. ९० टक्क्यांपेक्षा जास्त नागरिक साक्षर आहेत. यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त सुशिक्षित उमेदवारांना संधी मिळणे आवश्यक होते. परंतु, सर्वच राजकीय पक्षांनी शिक्षणापेक्षा उमेदवारांकडे किती पैसा आहे यालाच प्राधान्य दिले आहे. पैशाव्यतिरिक्त स्वत:च्या नातेवाइकांना उमेदवारी मिळवून दिली आहे. १११ जागांसाठी ५६८ उमेदवार निवडणुकीच्या रिंंगणात आहेत. यामधील २९४ उमेदवार पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण घेतलेले असल्याचे निदर्शनास आले आहे. ७ उमेदवारांचे काहीही शिक्षण झालेले नाही. अकरावी ते पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्यांची संख्या १३९ एवढी असून फक्त १२८ उमेदवार पदवीधर व त्यापेक्षा जास्त शिक्षण घेतलेले आहेत. राष्ट्रवादी काँगे्रस अपर्णा गवते बी.ए.एल.एल.एम.सिदरा खानबी.ए. एल.एल.बी.भारती पाटील बी.कॉम. एल.एल.एम.दिव्या गायकवाडएम. ए. एम. बी. ए.नम्रता बारवेएम.एस्सी.सुजाता पाटील एम.कॉम.जयेंद्र सुतारबी. ई. नेत्रा शिर्केबी.एस्सी. एम.एम.एस.स्वप्ना गावडेबी. ए.एल.एल.बी.डॉ. जयाजी नाथ पी.एच.डी. (यूएसए)ए.सी. एस.(यूएसए)जयंत हुदारपी.जी.डी. एम.बी.ई. काँगे्रस रविराज परमानेबी.एस्सी. एल.एल.बी. एम.बी.ए.अनिता सणसबीए.एल.एल.बी.गांगजी शहाबी.ई.गोपीनाथ मालुसरेबी. कॉम. एल.एल. बी.पूजा सिंगएम. ए. बी.एड. मनीषा बंडगरबी.ए. एल.एल.बी.धनाजी खराडे बी. ई. डॉ. प्रियंका ढोबळेएम.बी.बी.एस. रामेश्वरी पाटीलएम.एस्सी. एम.एड. अॅड. विलास तांडेल बी.ए. एल.एल. बी. डी. ए. एम. अॅड. नयना तळेकरबी. कॉम. एल.एल.बी.बापू पोळबीएस्सी. एल.एल.बी.सुनिता मुरूडकर बीए.एल.एल.एमपूनम मोरेएम.बी.ए.अॅड. प्रेरणा भोईरएल.एल.बी.अनिस चौधरीबी. ई.डॉ. सुजाता खांडेकर एम.डी. (ए. एम.)राजेंद्र शेलारबी.ए. एम.एस.डब्ल्यू.शीतल सोनावणेबी. ए. एल.एल.बी.नीलेश घागएम. कॉम.सी. ए. दीपक आवटेबी. ई. भाजपा सुवर्णा पाटील एम.एस्सी. अॅग्रीरवी जगताप एम.कॉम. बीएड.डॉ. तृप्ती झेमसे बी.डी.एस.उज्ज्वला बेल्हेकर एम.ए. बी.एड.डॉ. प्रणाली पाटील बी. ए. एम. एस.अॅड. मंगला ढेंबरेबी. ए. एल.एल.बी.सी. व्ही. आर. रेड्डीबी.ई. डिप्लोमा इन मॅनेजमेंटउमेदवारांचे शैक्षणिक वर्गीकरणवर्गवारीसंख्याटक्केवारीअशिक्षित७१ टक्का पहिली ते दहावी२९४५२ टक्केअकरावी ते पदवी१३९२४ टक्केपदवीधर१२८२३ टक्केसर्वच पक्षांमध्ये अल्पशिक्षितांचे प्रमाण जास्त असून पदवीधरांचा आकडा हाताच्या बोटावर मोजण्याएवढा आहे. राष्ट्रवादीमध्ये २२, काँगे्रसमध्ये २५, भाजपा ११ तर इतर पक्षांमध्ये ५६ जण पदवी किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षण घेतलेले आहेत.
उमेदवारांच्या शिक्षणाची बोंब
By admin | Published: April 17, 2015 12:24 AM