प्रचारासाठी उमेदवारांचे दौरे सुरू
By admin | Published: October 14, 2016 06:25 AM2016-10-14T06:25:30+5:302016-10-14T06:25:30+5:30
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी अर्ज भरलेल्या चार उमेदवारांपैकी काहींनी माघार घ्यावी, यासाठी काही साहित्यिकांनी मध्यस्थीचे
डोंबिवली : साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी अर्ज भरलेल्या चार उमेदवारांपैकी काहींनी माघार घ्यावी, यासाठी काही साहित्यिकांनी मध्यस्थीचे, माघारीचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्याला कितपत यश येते, ते सोमवारी स्पष्ट होईल. अक्षयकुमार काळे यांनी डोंबिवलीत प्रचार केल्यानंतर प्रवीण दवणे प्रचारासाठी नागपुरात पोहोचले तर जयप्रकाश घुमटकर रविवारी डोंबिवलीत येणार आहेत.
उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, यासाठी मलाही दोनतीन साहित्यिकांचे फोन आले, पण मी माघारीसाठी उभा नाही, असे घुमटकर यांनी स्पष्ट केले. मी अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रचार सुरू केला असून रविवारी आगरी युथ फोरम व काही साहित्यिकांच्या भेटीगाठी घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
संमेलन नियोजनासाठी डोंबिवलीतील सर्वेश सभागृहात ९ आॅक्टोबरला झालेल्या बैठकीला ते उपस्थित होते. मात्र, तोवर त्यांनी अर्ज भरलेला नव्हता. तीन टप्प्यांत ते राज्याचा दौरा करणार आहेत. चौथे उमेदवार मदन कुळकर्णी यांच्या प्रचाराबाबत तपशील समजू शकला नाही. (प्रतिनिधी)