Vidhan Sabha 2019: मुंबई शहरात ९४, उपनगरात २७२ उमेदवारांचे अर्ज वैध; वरळीत सर्वाधिक उमेदवार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2019 12:48 AM2019-10-06T00:48:37+5:302019-10-06T00:50:10+5:30
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंत आहे.
मुंबई : मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदार संघात ९४ नामनिर्देशन पत्र वैध ठरले आहेत. तर, उपनगर जिल्ह्यामध्ये २७२ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.
शहरात वरळीत सवार्धिक १६, उपनगरात अणुशक्तीनगरमध्ये सवार्धिक २० उमेदवार रिंगणात धारावी मध्ये १२, सायन कोळीवाडा मध्ये ११, वडाळामध्ये ६, माहिम मध्ये ४, वरळीमध्ये १६, शिवडी मध्ये ४, भायखळा मध्ये ११, मलबार हिल मध्ये १०, मुंबादेवी मध्ये १२, कुलाबा मध्ये ८ उमेदवार रिंगणात आहेत.
उपनगरातील बोरीवलीमध्ये ५, दहिसर मध्ये १०, मागाठाणेमध्ये ११, मुलुंड मध्ये १४, विक्रोळीमध्ये ९, भांडूप (पश्चिम) मध्ये ७, जोगेश्वरी (पूर्व) मध्ये ७, दिंडोशी मध्ये ११, कांदिवली (पूर्व) मध्ये ६, चारकोप मध्ये ७, मालाड (पश्चिम) मध्ये ११, गोरेगाव मध्ये ९, वसोर्वा मध्ये ११, अंधेरी (पश्चिम) मध्ये १०, अंधेरी (पूर्व)मध्ये ८, विलेपार्ले मध्ये ९, चांदिवली मध्ये १७, घाटकोपर (पश्चिम) मध्ये १६, घाटकोपर (पूर्व) मध्ये ११, मानखुर्द शिवाजीनगर मध्ये १५, अणुशक्तीनगर मध्ये २०, चेंबुर मध्ये १२, कुर्ला मध्ये ७,कलिना मध्ये १४, वांद्रे (पूर्व) मध्ये १५ उमेदवार रिंगणात आहेत.
वांद्रे (पश्चिम) विधानसभा मतदारसंघात आक्षेप घेतल्याने निर्णय प्रलंबित आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत निर्णय झाला नाही. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. त्यानंतर मुंबईचे चित्र स्पष्ट होणार आहे.