मुंबई : उत्तर पूर्व मुंबईत मोठ्या प्रमाणात व्यापारी वर्ग राहतो. युती- आघाडीच्या उमेदवारांकडून व्यापारीवर्गांकडे प्रचारासाठी साकडे घालण्यात येत आहे. गुरुवारी भांडुपमध्ये आघाडीच्या उमेदवार संजय पाटील यांनी व्यापारी संघटनांसोबत बैठक घेतली. त्यांचे विचार मांडले. यावेळी मुलुंड ते मानखुर्दमधील व्यावसायिक, व्यापारींनी हजेरी लावली होती. यावेळी व्यापा-यांनी खंत व्यक्त करत त्यांच्या समस्या मांडल्या. तसेच, त्यांच्याकडे येणारे ग्राहकांचा व्हॉट्सअप ग्रुप करुन त्याद्वारे ते आघाडीचा उमेदवाराचा प्रचार करत असल्याचे यावेळी सांगितले. यावेळी दुकानात येणा-या ग्राहकांपर्यंत आपले विचार कसे पोहचवता येतील याबाबतही यावेळी सांगण्यात आले.आघाडीच्या उमेदवारानेही मोदीसरकारविरुद्ध आरोप करत, आपले विचार व्यापा-यांपर्यंत त्यांच्यापर्यंत पोहचविले. तर, दुसरीकडे युतीच्या उमेदवारांकडून व्यापारी वर्गासाठी स्वतंत्र विभाग काम करत आहेत. दोघेही व्यापारी वर्गाची साखळी धरुन प्रचाराचा वेग वाढवताना दिसत आहेत. यापूर्वी युतीच्या उमेदवाराकडून डॉक्टर संघटनेसोबत बैठक घेण्यात आली होती. त्यांनाही प्रचारात ओढण्यात आले.
प्रचारासाठी व्यापाऱ्यांकडे उमेदवारांचे साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 1:00 AM