कर्णकर्कश हॉर्न पोलिसांना ऐकू येत नाही का भाऊ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:06 AM2021-06-30T04:06:24+5:302021-06-30T04:06:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईत सर्वप्रकारची ४० लाखांपेक्षा अधिक वाहने आहेत. कालबाह्य झालेल्या जुन्या वाहनांमुळे वायुप्रदूषण होत आहे; ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत सर्वप्रकारची ४० लाखांपेक्षा अधिक वाहने आहेत. कालबाह्य झालेल्या जुन्या वाहनांमुळे वायुप्रदूषण होत आहे; तर काही ट्रक, कंटेनर आणि दुचाकी वाहनांना कर्णकर्कश हॉर्न बसवून ध्वनिप्रदूषण केले जात आहे. असे असताना पोलिसांकडून संबंधितांवर कारवाई होण्याचे प्रमाण नगण्य आहे. हॉर्नचा आवाज पोलिसांना ऐकू येत नाही का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मुंबईत गेल्या काही वर्षांत तुलनेने अधिक आवाज करणारी बुलेट वापरणाऱ्यांचे प्रमाण वाढलेले आहे. ही गाडी ठरावीक वेगाने चालवली तर तिचा आवाज ठीकठाक असतो. मात्र, सायलेन्सरचा पाइप काढल की तोच आवाज कर्णकर्कश व नकोसा होतो. यासह महामार्गावरून धावणाऱ्या काही ट्रक, कंटेनरलाही कर्णकर्कश हॉर्न बसविण्यात आले आहेत.
म्युझिकल हॉर्नची फॅशन
शहरातील नवतरुण आपल्या महागड्या दुचाकींना ‘म्युझिकल हॉर्न लावतात. सध्या शहरात त्याची क्रेझ दिसून येत आहे. आपण कसे वेगळे आहोत, लावलेला हॉर्न किती महागडा आहे. त्यावर ही फॅशन दिवसेंदिवस वाढायला लागली आहे. सोबतच प्रेशर हॉर्न, बुलेट हॉर्न, सायरन हॉर्नदेखील पाहायवास मिळतो.
कर्णकर्कश हॉर्न वाजवला तर...
वाहनांच्या मूळ रचनेत परवानगीशिवाय बदल करता येत नाही; मात्र अनेक जण मन मानेल तसा बदल करतात.
वाहनांच्या हॉर्नचे किंवा सायलेन्सरचे कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांना पाच वर्षे कैद किंवा एक लाख रुपये दंडाची तरतूद नव्या निर्णयाद्वारे करण्यात आली आहे.
कानाचे आजार वाढू शकतात
शरीरावरील महत्त्वाच्या अवयवांपैकी एक असलेल्या कानांना कर्णकर्कश आवाजाने बाधा पोहोचू शकते. विशेषत: दुचाकी वाहने व महामार्गावरून जड वाहतूक करणाऱ्या ट्रक, कंटेनरच्या कर्णकर्कश हॉर्नमुळे कानाचे आजारही वाढू शकतात.
वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी यासाठी विशेष मोहीम राबवून कारवाया केल्या होत्या.
कर्णकर्कश हॉर्न असलेल्या वाहनांची चाचपणी करण्यात आली आहे. फटाक्यांसारखा आवाज करणाऱ्या बुलेटवर सायलेन्सर जप्त करण्यात येते. वाहनांच्या कर्णकर्कश हॉर्नवरही बहुतांशी नियंत्रण मिळविण्यात आले आहे
वरिष्ठ पोलीस अधिकारी, वाहतूक विभाग
वाहनचालकांना झालेला दंड
गुन्हा २०२० २०२१(मे पर्यंत)
सिग्नल उल्लंघन -२२७६५४-१४०१५९
विनाहेल्मेट - ७२२८२५ -३४८७७१
हॉर्न वाजवणे - १५८-१४२