गणराज विराजमान होणार ‘कॅनव्हास फ्रेम’ मखरांत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 03:51 AM2018-07-31T03:51:51+5:302018-07-31T03:52:10+5:30
यंदा थर्माकोलमुक्त गणेश चतुर्थी साजरी करण्यावर मुंबईतील मंडळे भर देताना दिसून येत आहेत. इकोफ्रेंडली मखर या संकल्पनेत यंदा कॅनव्हास फ्रेम मखरांची भर पडली आहे.
मुंबई : यंदा थर्माकोलमुक्त गणेश चतुर्थी साजरी करण्यावर मुंबईतील मंडळे भर देताना दिसून येत आहेत. इकोफ्रेंडली मखर या संकल्पनेत यंदा कॅनव्हास फ्रेम मखरांची भर पडली आहे. कॅनव्हासवर गणपतीच्या मूर्तीला शोभेल अशी पेंटिंग तयार करून त्यात गणपती बसविले जाणार आहेत.
तसेच कागदी आणि पुठ्ठ्याचे मखर बनविण्यासाठी ‘उत्सवी’ या संस्थेने पुढाकार घेतला आहे.
मागील १७ वर्षांहून अधिक काळ
या संस्थेमार्फत पर्यावरणपूरक मखरांची निर्मिती केली जाते. गणेशभक्तांच्या मागणीप्रमाणे कलाकार मखराची मांडणी, डिझाइन तयार करतात, असे ‘उत्सवी’चे संस्थापक नानासाहेब शेंडकर यांनी सांगितले.
दरम्यान, स्वास्थ्यरंग संस्थेच्या वतीने कॅनव्हास आणि उत्सवी संस्थेच्या वतीने कागदी आणि पुठ्ठ्यांच्या मखरांचे मोफत प्रदर्शन भरविण्यात आल्याची माहिती स्वास्थ्यरंगचे तेजस लोखंडे यांनी दिली.