मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते हजरत निजामुद्दीन या मार्गावर आठवड्यातून दोनदा धावणारी राजधानी एक्स्प्रेस पुढील १५ दिवसांत चार वेळा धावणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.
राजधानी आठवड्यातून चार वेळा चालविण्यासाठी आणखी एका रेकची आवश्यकता आहे. हा रेक आल्यावर त्याची तपासणी करून १५ दिवसांनंतर प्रवाशांना आठवड्यातून चार वेळा मुंबई-दिल्ली प्रवास करता येईल. दुसºया राजधानी एक्स्प्रेसला पुश-पूल इंजिन जोडण्यात येणार आहे. त्यामुळे दोन्ही राजधानी एक्स्प्रेसचा वेग, घाटातून जाण्याची क्षमता सारखी असणार आहे, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.
मध्य रेल्वे मार्गावर मुंबई ते दिल्ली पहिली राजधानी एक्स्प्रेस जानेवारी महिन्यात सुरू केली. त्यामुळे ठाणे, कल्याण, पनवेल, नाशिक, जळगाव, भोपाळ येथील या राजधानी एक्स्प्रेसचा खूप फायदा झाला आहे.