कॅप्टन दीपक साठे यांच्या कुटुंबीयांना तत्काळ मदतनिधी मिळणार; ‘लोकमत’च्या पाठपुराव्याला यश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 10:15 AM2021-05-22T10:15:44+5:302021-05-22T10:16:06+5:30

राज्य कामगार आयुक्तालयाकडून नोडल अधिकाऱ्याची नेमणूक

Captain Deepak Sathe's family will get immediate relief; Success in the pursuit of ‘Lokmat’ | कॅप्टन दीपक साठे यांच्या कुटुंबीयांना तत्काळ मदतनिधी मिळणार; ‘लोकमत’च्या पाठपुराव्याला यश

कॅप्टन दीपक साठे यांच्या कुटुंबीयांना तत्काळ मदतनिधी मिळणार; ‘लोकमत’च्या पाठपुराव्याला यश

Next

सुहास शेलार

मुंबई : कोझीकोडे विमान दुर्घटनेवेळी आपल्या प्राणाची बाजी लावून जवळपास १७२ प्रवाशांचा जीव वाचविणाऱ्या मराठमोळ्या कॅ. दीपक साठे यांच्या कुटुंबीयांना आता त्यांच्या हक्काचा मदतनिधी मिळणार आहे. ‘लोकमत’च्या पाठपुराव्यानंतर त्यांना कम्पान्सेशनची रक्कम मिळवून देण्यासाठी सहाय्यक आयुक्त दर्जाच्या नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. केवळ एका दिवसातच नियुक्तीसाठी प्रक्रिया पूर्ण झाली.

मुसळधार पावसात दृश्यमानता कमी असल्याने टेबल रनवेवर उतरताना विमान धावपट्टीपुढील खोलगट भागात कोसळले. ७ ऑगस्ट २०२० रोजी केरळच्या कोझीकोडे विमानतळावर एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला हा अपघात झाला होता. कॅ. साठे यांनी आपला अनुभव आणि कसब पणाला लावून १९० प्रवाशांपैकी १७२ प्रवाशांचा जीव वाचवला. ते स्वतः मात्र या दुर्घटनेत मृत्युमुखी पडले. या कर्तृत्वाची दखल घेत केरळ सरकारकडून त्यांच्या कुटुंबीयांना दहा लाखांचा मदतनिधी जाहीर करण्यात आला. लॉकडाऊनमुळे केरळला जाणे शक्य नसल्याने रक्कम महाराष्ट्र राज्याकडे हस्तांतरित करण्याची विनंती साठे कुटुंबीयांनी केली होती. त्यानुसार केरळ सरकारने कम्पान्सेशन कमिशनरकडे ही रक्कम ३ मार्चला पाठविली.

परंतु, सरकारी कार्यालयांचे हेलपाटे मारूनही हक्काची मदत मिळत नसल्याची खंत दीपक साठे यांच्या मुलाने ट्वीटरद्वारे व्यक्त केली होती. त्यानंतर ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने केंद्रीय कामगार आयुक्त, राज्य कामगार आयुक्तांची भेट घेऊन त्यांचा कानावर ही बाब घातली. राज्य कामगार आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी याची दखल घेत आपल्या अधिकाऱ्यांना प्रकरणाची तत्काळ शाहनिशा करण्याचे आदेश दिले.
 

Web Title: Captain Deepak Sathe's family will get immediate relief; Success in the pursuit of ‘Lokmat’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.