कॅप्टन विनायक गोरे उड्डाणपुलावरील दिवे गेले अनेक महिने बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:06 AM2021-09-18T04:06:59+5:302021-09-18T04:06:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क प्रभाग क्रमांक ८४ मध्ये सुरू होणारा तसेच प्रभाग क्रमांक ७० मध्ये उतरणारा कॅप्टन विनायक गोरे उड्डाणपुलावर ...

Captain Vinayak Gore The lights on the flyover went off for several months! | कॅप्टन विनायक गोरे उड्डाणपुलावरील दिवे गेले अनेक महिने बंद!

कॅप्टन विनायक गोरे उड्डाणपुलावरील दिवे गेले अनेक महिने बंद!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

प्रभाग क्रमांक ८४ मध्ये सुरू होणारा तसेच प्रभाग क्रमांक ७० मध्ये उतरणारा कॅप्टन विनायक गोरे उड्डाणपुलावर गेल्या अनेक दिवसांपासून अंधार पसरला आहे. उड्डाणपुलावरील रस्त्यालगत असलेले विजेचे दिवे गेल्या कित्येक महिन्यांपासून बंद आहेत. त्यात अनंत चतुर्दशीला लाडक्या बाप्पाला निरोप द्यावा लागणार असून, त्याकरता विलेपार्ले पूर्वेकडून जुहू बीच येथे विसर्जनासाठी जाण्याकरिता या कॅप्टन विनायक गोरे उड्डाणपुलाचा वापर केला जातो. विलेपार्ल्यातील बरीच सार्वजनिक गणपती मंडळ तसेच घरगुती गणपती आपापल्या मूर्त्या घेऊन या ब्रिजवरून जाणार आहेत. ब्रिजवरील प्रभाग ७० जवळील सहा दिवे बंद असल्याकारणामुळे नागरिकांना अंधारातनूच रस्ता पार करावा लागेल. गणेश भक्तांची ही गैरसोय होऊ नये म्हणून येथे दिव्यांची रोषणाई करण्यासाठी स्वतः प्रयत्नशील असल्याचे मनसैनिक व स्वरराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष समीर काळे यांनी लोकमतला सांगितले.

Web Title: Captain Vinayak Gore The lights on the flyover went off for several months!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.