लॅपटॉपचा खजिना हस्तगत

By admin | Published: June 25, 2014 12:01 AM2014-06-25T00:01:44+5:302014-06-25T00:01:44+5:30

शहरात लॅपटॉपची चोरी करणा:या टोळीतील 3 आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

Capture the laptop's treasure | लॅपटॉपचा खजिना हस्तगत

लॅपटॉपचा खजिना हस्तगत

Next
>नवी मुंबई : शहरात लॅपटॉपची चोरी करणा:या टोळीतील 3 आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपींकडून विविध कंपन्यांचे तब्बल 35 लॅपटॉप हस्तगत केले असून आतार्पयतची ही सर्वात मोठी कामगिरी आहे.
अटक केलेल्या ओरोपींमध्ये प्रभु कोरे, शाम सोनावणो व मोसीन खान यांचा समावेश आहे. नवी मुंबईमध्ये मागील दोन वर्षापासून लॅपटॉप चोरटय़ांनी धुमाकूळ घातला आहे. कारच्या काचा तोडून व घरांमधून मोठय़ाप्रमाणात चोरी होवू लागली होती. लॅपटॉपची विक्री करणो सहज शक्य होत असल्यामुळे अशा चो:या वाढू लागल्या होत्या. या पाश्र्वभूमीवर पोलिसांनी या टोळ्यांचा शोध सुरू केला होता. कोपरखैरणो पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक नाईक, सतिष गायकवाड यांनी घणसोलीमध्ये सापळा रचून तीन आरोपींना अटक केली. चौकशी केली असता त्यांच्याकडे एक लॅपटॉप सापडला. 
आरोपींकडे तपास केला असता त्यांनी चोरी केलेले लॅपटॉप वाशी सेक्टर 18 मधील संगणक व्यवसायीक चंदन कुमार रामप्रसाद शर्मा याच्याकडे दिले असल्याचे सांगितले. पोलिसांनी सदर दुकानात धाड टाकून चोरीचे तब्बल 35 लॅपटॉप जप्त केले आहेत. पोलिस उपआयुक्त सुरेश मेंगडे, सहायक पोलिस आयुक्त अरूण वालतुरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली असून यामध्ये अजून कोणाचा समावेश आहे का हेही तपासले जात आहे. (प्रतिनिधी)
 
पोलिसांशी संपर्क साधावा
4ज्या नागरिकांचे लॅपटॉप चोरीला गेले आहेत त्या नागरिकांनी कोपरखैरणो पोलिस स्टेशनशी संपर्क साधावा. त्यांच्या लॅपटॉपविषयी व केलेल्या तक्रारीविषयी माहिती द्यावी असे आवाहन पोलिस उपआयुक्त सुरेश मेंगडे यांनी केले. 

Web Title: Capture the laptop's treasure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.