Join us

Video: इंधन दरवाढीमुळे कारने आत्महत्या केली? जाणून घ्या कार बुडण्यामागील सत्य...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 8:13 AM

car sinking in Ghatkopar: सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. जीवितहानी नाही; घाटकोपर, कामा लेन येथील दुर्घटना 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : घाटकोपर पश्चिमेतील कामा लेन येथील त्रिभुवन मिठाईवालाच्या मागे रामनिवास या खासगी सोसायटीच्या आवारात विहीर आहे. विहिरीच्या अर्ध्या भागावर आरसीसी करून ती झाकली होती. त्या आरसीसी केलेल्या भागावर रहिवासी कार पार्क करीत. मात्र रआरसीसीचा भाग खचून पार्क केलेली कार पाण्यात बुडाल्याची घटना रविवारी घडली. कारमध्ये कोणी नसल्याने मनुष्यहानी झाली नाही. रात्री साडेनऊच्या सुमारास क्रेनच्या मदतीने कार बाहेर काढण्यात आली. (Car sinking incidence in Ghatkopar, mumbai.)

सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. मुंबई पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन खात्याने सांगितले की, येथील कारच्या घटनेशी महापालिकेचा दुरान्वये संबंध नाही. घाटकोपर भागातील खासगी सोसायटीत १३ जून रोजी सकाळी ही घटना घडली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयाद्वारे पाणी उपसण्याच्या कामाचे समन्वयन करण्यात आले. त्यानंतर कार क्रेनने बाहेर काढली.  

क्रेनने कार काढली बाहेरसोसायटीने आरसीसी करून अर्धी विहीर झाकली होती. त्यावर रहिवासी वाहने पार्क करीत असत. आरसीसी पावसामुळे खचून त्यावर पंकज मेहता यांनी पार्क केलेली कार विहिरीत पडली. यात काेणी जखमी झाले नाही किंवा मनुष्यहानी झाली नाही. क्रेनच्या मदतीने रात्री साडेनऊच्या दरम्यान कार बाहेर काढण्यात आली.- नागराज मजगे, प्रभारी पोलीस निरीक्षक, घाटकोपर वाहतूक विभाग

रविवारच्या सुट्टीमुळे वाचला जीव !गाडी मालक पंकज मेहता यांचा मुलगा दररोज सकाळी गाडी काढत असतो, पण आज रविवार असल्याने तो आला नाही आणि त्याच वेळेला हा अपघात घडला. पण सुट्टी असल्याने मुलाचा जीव वाचला.

टॅग्स :कारमुंबई