Join us  

कॅराव्हॅन उपक्रमामुळे पर्यटनाला चालना मिळणार, देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2022 8:18 AM

कॅराव्हॅन पर्यटन अनेक देशांमध्ये प्रसिद्ध आहे. भारतात मात्र हा प्रकार अभावानेच पाहायला मिळतो. कॅराव्हॅनसारखा स्तुत्य उपक्रम आपल्या राज्यात सुरू होत आहे.

मुंबई : 

कॅराव्हॅन पर्यटन अनेक देशांमध्ये प्रसिद्ध आहे. भारतात मात्र हा प्रकार अभावानेच पाहायला मिळतो. कॅराव्हॅनसारखा स्तुत्य उपक्रम आपल्या राज्यात सुरू होत आहे. या उपक्रमामुळे पर्यटनाला चालना मिळेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले. कॅराव्हॅन उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी उपमुख्यमंत्री बोलत होते.

कार्यक्रमाला केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड, राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, 'लोकमत'चे प्रबंध संचालक देवेंद्र दर्डा, व्हॅन कल्चर टुरिझमच्या संचालिका अनुलिका रावनगवे उपस्थित होत्या. यावेळी बोलताना केंद्रीय अर्थराज्यमंत्री कराड़ म्हणाले की, जगात सर्वांत जास्त स्टार्ट अप आपल्या देशात होत आहेत. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून सुरू करण्यात आलेला हा प्रकल्प नक्की यशस्वी होईल.

पर्यटनाला आकार येईल हा उपक्रम केवळ मार्ग दाखवण्यासाठी नसून यामुळे इतरही सक्षम होतील, असे गुंतवणूकदार सतीश पवार म्हणाले.

परवडणारा आणि वेळ वाचवणारा प्रवासअलीकडच्या वर्षांत पर्यटनावरील देशांतर्गत खर्चात लक्षणीय वाढ झाली आहे. हे भारतातील पर्यटनाच्या परिवर्तनाचे चांगले संकेत आहेत. काळाच्या गरजेनुसार आणि पर्यटकांच्या मागणीनुसार, पर्यटन मंत्रालयाने कॅराव्हॅन आणि कॅराव्हॅन कॅम्पिंग पार्क्सच्या विकास आणि प्रचारावर लक्ष केंद्रित करून एक विशिष्ट धोरण तयार केले आहे. तुम्ही एकट्याने प्रवास करीत असाल किया सहाजणांच्या कुटुंबासहित हा खास प्रवास अधिक परवडणारा वेळ वाचवणारा आहे. तसेच पूर्णपणे सुरक्षित आहे, जिथे तुम्हीच तुमच्या प्रवा सर्वेसर्वा आहात,- अतुलिका रावनगये, संचालिका, व्हॅन कल्चर टुरिझम

राज्याबाहेर जाऊ नका : लोढाकुटुंब आणि मित्रांसोबत एकत्र सुट्टी घालवण्यासाठी कॅराव्हॅन लाईफसारखा उपक्रम राज्यात पर्यटनाला प्रोत्साहन देणारा असून त्यांनी राज्याबाहेर जाऊ नये, असा सल्ला पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिला.

उपक्रम काय?कुटुंब आणि मित्रांसोबत एकत्र सट्टी घालवण्यासाठी कॅराव्हॅन लाईफ नावाचा एक नवीन पर्यटन उपक्रम आहे. यामध्ये निसर्गरम्य ठिकाणी तुम्ही मोटार होम म्हणून उभी करू शकता. मोटारीमध्ये पर्यटनासाठी सोयीने सुसज्ज असणारे, अगदी पोर्टेबल घर असते.

वन स्टॉप डेस्टिनेशनcaravaanilife.com संकेतस्थळामुळे पर्यटकांकडे कॅरव्हॅन हॉलिडेज हे आता पर्यटनबाबत सर्व गोष्टीसाठी वन स्टॉप डेस्टिनेशन आहे. हे संकेतस्थळ ग्रुप्ससाठी पूर्ण भारतात बुकिंग सेवा तसेच जवळपास कॅम्पसाठी जागा राहण्याची खाण्यापिण्याची सोय असलेली हॉटेल्स, एटीएम, चार्जिंग स्टेशन, पेट्रोल पंप्स, वायफाय, किराणा सामान, हॉस्पिटल्स, चांगली पर्यटन ठिकाणे यांबाबतची मदत व माहिती पुरवते.

टॅग्स :देवेंद्र फडणवीस