Join us

‘फ्युचर मंत्रा’मध्ये करिअर मार्गदर्शन

By admin | Published: November 17, 2016 6:25 AM

बारावीनंतर करिअर म्हणून काय निवडावे, हा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांना पडतो. हाच प्रश्न सोडवण्यासाठी ‘लोकमत’ व ‘व्हीआयटी’ विद्यापीठातर्फे

मुंबई : बारावीनंतर करिअर म्हणून काय निवडावे, हा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांना पडतो. हाच प्रश्न सोडवण्यासाठी ‘लोकमत’ व ‘व्हीआयटी’ विद्यापीठातर्फे ‘फ्युचर मंत्रा’ या सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. १७ आणि १८ नोव्हेंबर रोजी या सेमिनारचे आयोजन करण्यात आले असून, ११वी आणि १२वीच्या विद्यार्थ्यांनी करिअरसंबंधीच्या प्रश्नांचे मोफत मार्गदर्शन मिळणार आहे. १७ नोव्हेंबर रोजी व्हीआयटी विद्यापीठाचे फिजिक्स विभागाचे असोसिएट प्रोफेसर गिरीश मुकुंदराव जोशी आणि मधुसुदना राव, तसेच समर्थ एज्युकेअर एलएलपीचे संचालक समर्थ पालकर मार्गदर्शन करणार आहेत. तर १८ नोव्हेंबर रोजी लाइव्हचे चीफ आॅपरेंटिग आॅफिसर नीलेश सुतार मार्गदर्शन करणार आहेत. उत्तम करिअर घडविण्याच्या इच्छेला योग्य मार्गदर्शनाची जोड मिळणे आवश्यक असते, म्हणूनच ‘लोकमत’ने या सेमिनारचे आयोजन केले आहे. विद्यार्थी आणि पालक या दोघांसाठी हे सेमिनार मार्गदर्शक ठरणार आहेत. म्हणूनच पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी सेमिनारचा आवर्जून लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९८३३८६९२२३, ८६५२२००२२१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)