Join us

ज्वेलरी डिझायनिंगमधून करिअर

By admin | Published: June 14, 2016 2:36 AM

टीव्हीवरून झळकणाऱ्या दागिन्यांच्या जाहिराती पाहिल्या की अनेकांचे डोळे सुखावतात. सुंदर नक्षींनी बनलेल्या या दागिन्यांमागे मानवी हाताची कलाकुसर असते.

मुंबई : टीव्हीवरून झळकणाऱ्या दागिन्यांच्या जाहिराती पाहिल्या की अनेकांचे डोळे सुखावतात. सुंदर नक्षींनी बनलेल्या या दागिन्यांमागे मानवी हाताची कलाकुसर असते. याचा अभ्यास शिकवणारा ‘ज्वेलरी डिझायनिंग’ अभ्यासक्रम सध्या करिअरच्या विविध संधी उपलब्ध करून देत आहे.सोने, चांदी, मोती, पोवळे, हिरे यांच्या संगतीतून सुंदर दागिना बनवण्याचे कसब ज्वेलरी डिझायनरचे असते. केवळ सोनार दागिने घडवतो, हे खरे असले, तरी अनेक दागिन्यांच्या घडणावळीमागे डिझायनरचे कौशल्य पणाला लागलेले असते. यासाठीचे योग्य प्रशिक्षण देणारा अभ्यासक्रम अर्थात, सध्या ज्वेलरी डिझायनिंग नावाने ओळखला जाणारा अभ्यासक्रम अनेक ठिकाणी शिकवला जातो. हा अभ्यासक्रम पदविका आणि पदवी स्तरावर उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, अगदी दहावीनंतर याचे प्रशिक्षण घेता येऊ शकते. हे अभ्यासक्रम सहा महिने ते तीन वर्षांपर्यंत असतो. यात ज्वेलरी क्रिएटिव्ह, मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी, बेसिक जेमोलॉजी, डायमंड ग्रेडिंग, मार्केट रिसर्च असे विषय शिकवले जातात. पदवी शिक्षणानंतर पदव्युत्तर शिक्षणाचा पर्यायही यात उपलब्ध आहे. कॉम्प्युटरचे महत्त्व लक्षात घेत, कॉम्प्युटरच्या साहाय्याने ज्वेलरी डिझाइनचे प्रशिक्षण दिले जाते. यात कॉम्प्युटरमध्ये डिझाइन कशा करायच्या, या विषयीचे ज्ञान दिले जाते. (प्रतिनिधी)पात्रता- ज्वेलरी डिझायनिंगचा अभ्यासक्रम दहावीनंतरदेखील करता येऊ शकतो. दहावीनंतर पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येऊ शकेल. शिवाय बारावीनंतर पदवी अभ्यासक्रम ज्वेलरी डिझायनिंगमध्ये उपलब्ध आहेत. करिअरच्या संधी- ज्वेलरी डिझायनिंग या क्षेत्राला झळाळी प्राप्त झाल्यामुळे अनेक मोठ्या ज्वेलरी कंपन्यांमध्ये, म्युझिअम, अँटिक हाउसमध्ये ज्वेलरी डिझायनर पदावर नोकरी मिळू शकते. याशिवाय, ज्वेलरी मर्चेंडायझर, फॅशन कन्सल्टंट, जेम ग्राइंडर, ज्वेलरी हिस्टोरिअन, सायंटिस्ट अशा विविध पदांवर काम करता येऊ शकते. मुळातच ज्वेलरी डिझायनिंगचे काम सोपे नसून, विविध पायऱ्यांवर दागिना घडत असतो. त्यामुळे तेथील प्रत्येक कामासाठी डिझायनरची आवश्यकता असते. तुमच्या आवडीनुसार तुम्ही काही विषयांत स्पेशलायझेशन करू शकता. शिवाय स्वत:चे ज्वेलरी बुटिक उघडू शकता.प्रशिक्षण देणाऱ्या शिक्षण संस्था- गरवारे शिक्षण संस्था, मुंबई विद्यापीठ- इंटरनॅशनल जेमोलॉजी इन्स्टिट्यूट, ओपेरा हाउस- सेंट झेवियर्स महाविद्यालय, मुंबई सीएसटी- एसएनडीटी महिला विद्यापीठ- सनशाइन ज्वेलरी डिझायनिंग, कॉटन ग्रीन- इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ जेम्स अँड ज्वेलरी, अंधेरी- इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ ज्वेलरी, महालक्ष्मी- सिंहगड स्कूल आॅफ जेमोलॉजी अँड ज्वेलरी डिझायनिंग, पुणे- इन्स्टिट्यूट आॅफ फॅशन टेक्नॉलॉजी, दिल्ली