पुन:श्च हरिओमच्या दुसऱ्या दिवशी सावध पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 02:02 AM2020-06-10T02:02:04+5:302020-06-10T02:02:18+5:30

मुंबापुरी वेग पकडतेय : बहुतांश व्यवहार आले पूर्वपदावर; मुंबईकरांनी ठेवले फिजिकल डिस्टन्सिंगचे भान

Careful step on the second day of Hariom again | पुन:श्च हरिओमच्या दुसऱ्या दिवशी सावध पाऊल

पुन:श्च हरिओमच्या दुसऱ्या दिवशी सावध पाऊल

Next

मुंबई : लॉकडाऊनमधून बाहेर पडण्यासाठी पुन:श्च हरिओममध्ये मुंबई महापालिकेने काही सुधारणा केल्या असून, त्यानुसार आता सोमवार ते शनिवार दुकाने पूर्णवेळ सुरू राहणार असतानाच अनलॉकच्या तिसºया टप्प्याच्या दुसºया दिवशी म्हणजे मंगळवारी सकाळची मुंबई धावतानाच निदर्शनास आली. दुपारी २ ते ४ हा काळ वगळला तर सायंकाळसह रात्रीही मुंबईमधील बहुतांश व्यवहार पूर्वपदावर येत असल्याचे चित्र होते. महत्त्वाचे म्हणजे बेस्ट बसची गर्दी वगळता उर्वरित बहुतांश ठिकाणी मुंबईकरांनी सामाजिक अंतर पाळल्याचे सकारात्मक चित्र होते. मात्र बाजारपेठा, बेस्ट बसच्या रांगा, प्रवास आणि गर्दीच्या ठिकाणी मात्र सामाजिक अंतर पाळण्याबाबतच्या नियमांची ऐशीतैशी झाल्याचे चित्र होते.

कोरोनाला हरविण्यासाठी लागू करण्यात आलेले लॉकडाऊन आता शिथिल करण्यात येत आहे. सोमवारी मुंबई शहर आणि उपनगरातील खासगी आणि सरकारी कार्यालये सुरू झाली असून, तेथे सर्व नियम पाळण्यात यावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. सोमवारी मुंबईत सर्वत्रच सामाजिक अंतर धाब्यावर बसविले गेले असतानाच मंगळवारीही म्हणजे दुसºया दिवशी सर्वसाधारणरीत्या हीच परिस्थिती होती. मंगळवारची सकाळ उजाडताच मुंबईत खासगी आणि सरकारी कार्यालयांमध्ये दाखल होणाºया नोकरदारांकडून बेस्ट बस पकडण्यासाठी गर्दी होत होती. आजघडीला बेस्ट बसमधून सरकारी, खासगी कर्मचाऱ्यांसह केवळ स्वयंरोजगार असलेल्या व्यक्तींना प्रवेश दिला जात असून, बेस्टमध्ये सामाजिक अंतर पाळून प्रवाशांनी प्रवास केला. एका बैठक व्यवस्थेवर एक व्यक्ती याप्रमाणे बेस्ट बसच्या फेºया सुरू होत्या.
सकाळी मुंबईच्या रस्त्यांवर बेस्ट बसप्रमाणेच रिक्षा, टॅक्सी यांची गर्दी दिसून आली. याशिवाय दुचाकीचाही भरणा मोठ्या प्रमाणावर होता. मुंबईच्या रस्त्यांवर वाहने धावू लागत असतानाच बहुतांश बाजारपेठांमधील दुकानेही खुली झाली होती. दुकानांसोबत ठिकठिकाणी मंडयासुद्धा उघडण्यात आल्या होत्या. मुंबई महापालिकेसह पोलिसांनी सामाजिक अंतर पाळण्याचे आवाहन केल्याने मुंबई शहर आणि उपनगरातील बहुतांश मंडयांमध्ये भाजीविक्रेत्यांनी सामाजिक अंतर पाळल्याचे चित्र होते. मात्र अनेक ठिकाणी भाजी खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केल्याने सामाजिक अंतराचे तीनतेरा वाजले होते.
दुपारी बारा वाजेपर्यंत धावत असलेल्या मुंबईचा वेग किंचित कमी झाला. बेस्टमधील प्रवाशांची गर्दी कमी झाली. रस्त्यावरील उर्वरित वाहनांचा वेगदेखील कमी झाला. जसजशी दुपारी होऊ लागली तसतसे बाजारही उठू लागले. केवळ मेडिकल आणि अन्नधान्याची दुकाने सुरू असल्याचे निदर्शनास आले.
आणि दुपारनंतर पुन्हा एकदा
मुंबईतले बहुतांश रस्ते ओस पडू लागले.
मात्र महत्त्वाची वाहने रस्त्यावरून धावतच होती. दुपारी २ ते ४ वाजेपर्यंत पुन्हा एकदा मुंबईचा वेग मंदावला होता.
सायंकाळी पाचनंतर पुन्हा व्यवहार पूर्वपदावर येऊ लागला. बेस्टमधील प्रवाशांची गर्दी वाढू लागली. रस्त्यांवरील वाहनांची वर्दळ पुन्हा वेगाने सुरू झाली.

झवेरी बाजारातून सोन्याची निर्यात होते. दररोज १८० ते २०० कोटी रुपयांची उलाढाल होते. मात्र कोरोनाने देशात थैमान घातले आणि लॉकडाऊन सुरू झाले. त्यामुळे ही बाजारपेठही बंद झाली. बाजारात जवळपास साडेचार ते पाच लाख मजूर काम करत होते. मात्र लॉकडाऊनमुळे मजूर गावी परत गेले. आता झवेरी बाजारातील व्यवहार पूर्वपदावर येत असले तरी आता फक्त ३० ते ४० हजार कारागीर उपलब्ध आहेत. याचा परिणाम सोन्याच्या उद्योगावर होईल, अशी माहिती व्यापाºयांनी दिली.

वीजबील भरण्यासाठी रांगा
गेल्या अडीच महिन्यांपासून वीजबील भरणा केंद्र बंद आहेत. अशा वेळी ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून वीज कंपन्यांनी फिरती वाहने सुरू केली आहेत. या वाहनांमध्ये वीजग्राहकांनी आपले जुने बिल दाखविले तर त्यांना नव्या वीजबिलाचे प्रिंट आऊट काढून दिले जाते. आणि तेथे रोख रक्कम किंवा धनादेशाद्वारे वीजग्राहकाला बिल भरता येते. अदानी वीज कंपनीने ही सेवा सुरू केली असून, वारनिहाय ही वाहने मुंबई शहर आणि उपनगरातील वीजग्राहकांना सेवा देत आहेत. मंगळवारी या वीजबिल भरणा केंद्रावर ग्राहकांनी वीजबिल भरण्यासाठी गर्दी केली होती.

वीजबील भरण्यासाठी रांगा
गेल्या अडीच महिन्यांपासून वीजबील भरणा केंद्र बंद आहेत. अशा वेळी ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून वीज कंपन्यांनी फिरती वाहने सुरू केली आहेत. या वाहनांमध्ये वीजग्राहकांनी आपले जुने बिल दाखविले तर त्यांना नव्या वीजबिलाचे प्रिंट आऊट काढून दिले जाते. आणि तेथे रोख रक्कम किंवा धनादेशाद्वारे वीजग्राहकाला बिल भरता येते. अदानी वीज कंपनीने ही सेवा सुरू केली असून, वारनिहाय ही वाहने मुंबई शहर आणि उपनगरातील वीजग्राहकांना सेवा देत आहेत. मंगळवारी या वीजबिल भरणा केंद्रावर ग्राहकांनी वीजबिल भरण्यासाठी गर्दी केली होती.

Web Title: Careful step on the second day of Hariom again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.