वर्सोव्याच्या आश्रमशाळेतील १५ दिव्यांग मुलांना काेराेनाची बाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:06 AM2021-05-19T04:06:07+5:302021-05-19T04:06:07+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क मुंबई : वर्साेवा मच्छीमार सहकारी सोसायटीलगत असलेल्या अवर लेडी हेल्थ चर्च येथील आश्रमशाळेतील १५ दिव्यांग मुलांना ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वर्साेवा मच्छीमार सहकारी सोसायटीलगत असलेल्या अवर लेडी हेल्थ चर्च येथील आश्रमशाळेतील १५ दिव्यांग मुलांना काेराेनाची बाधा झाली आहे. त्यांची काेराेना चाचणी पाॅझिटिव्ह आली असून इतर मुलांना बाधा होऊ नये म्हणून प्रत्येक मुलाला स्वतंत्रपणे येथील चर्चच्या हॉस्टेलच्या खोलीतच ठेवण्यात आले.
काेराेना झालेल्या मुलांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.
येथील १५ मुलांना ताप येत असल्याची माहिती मिळताच बाजार व उद्यान समिती अध्यक्ष व प्रभाग क्रमांक ५९ च्या शिवसेना नगरसेविका प्रतिमा खोपडे, उपविभागप्रमुख राजेश शेट्ये, शाखाप्रमुख सतीश परब, के पश्चिम वॉर्डचे डॉ. आदिल यांनी आश्रमशाळेला भेट येथील संबंधित नन्सशी बोलून त्यांना उपचारांसाठीच्या मदतीसंबंधी आश्वस्त केले. यावेळी उपशाखाप्रमुख राजेश रासम, राजेश पुरंदरे, ज्ञानेश्वर कारंडे, आश्विनी पाटील, शैलेश खोपडे आदी शिवसैनिक उपस्थित होते.
........................................