- प्राची सोनवणे, नवी मुंबई गेल्या काही आठवड्यांपासून आंब्याची आवक वाढली असून गेल्या वर्षीच्या तुलनेने आंब्याच्या दरातही दुपटीने घट झाली आहे. गुरुवारी ९५ हजार क्रेट आंब्याच्या पेट्या वाशीतील कृषी उत्पन्न बाजार समितीत दाखल झाल्या असून यामधील २५ हजार के्रट आंब्याच्या पेट्या या कर्नाटकी हापूसच्या आहेत. कोकणातला हापूस या नावाखाली या दक्षिणेकडून आलेल्या आंब्याची विक्री केली जात असून ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. हे आंबेदेखील कोकणातील हापूस आंब्यासारखे दिसत असून किरकोळ विक्रेते देवगडचा हापूस म्हणूनच विकत आहेत. त्यामुळे बागायतदार व व्यापाऱ्यांची मोठी पंचाईत झाली आहे.कोकणातील हापूस आंब्यासोबतच फळबाजारात येणाऱ्या कर्नाटक राज्यातील हुबळी, धारवाड, शिमुगा, भद्रवती, रामनगर आदी भागातील हापूस आंब्यांना चांगलीच मागणी आहे तर केरळ राज्यातील कोचिन बाजारपेठेतील हापूस आंबेदेखील एपीएमसीत दाखल झाले आहेत. स्वस्त आणि मस्त वाटणारा हा हापूस आंबा कोकणातील हापूस आंब्यासारखाच दिसत असून उत्तर भारतीय, बिहारी, आणि पश्चिम बंगाली किरकोळ विक्रे ते या हापूस आंब्याला जास्त पसंती देत आहेत. ८० ते १९० प्रतिडझन असलेला हा आंबा जास्त विकला जात असून कोकणातील चांगल्या प्रतिच्या हापूस आंब्याचा यापेक्षा दुप्पट दर असल्याने किरकोळ विक्रे त्यांकडून कर्नाटकी हापूसला अधिक पसंती मिळत आहे. त्यामुळे गुरुवारी कर्नाटकमधून आलेल्या या आंब्याच्या २५ हजार पेट्या हातोहात संपत असल्याचे व्यापारी संजय पानसरे यांनी सांगितले. गेल्या आठवड्याच्या तुलनेने हापूस आंब्याच्या पेट्यांची आवक १४ हजाराने वाढली आहे. दरात वाढ झालेली नसून सर्वसामान्यांनाही हापूसची चव चाखता येत आहे. गेल्या आठवड्यात ८१ हजार आंब्याच्या पेट्यांची आवक झाली होती. हापूस आंब्याच्या पेट्या १ हजार ते ४००० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. येत्या आठवड्यात आवक आणखी वाढणार असून दर स्थिर राहणार असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. कोकण-कर्नाटकी आंब्यातील फरकहापूस पिकल्यावर ताजातवाना, चकचकीत व केशरी रंगाचा कधीच दिसत दिसत नाही. सालावर डाग मोठ्या प्रमाणावर दिसतात. या उलट कर्नाटक आंबा कृत्रिमरीत्या नव्या पद्धतीने रासायनिक फवारणी करून चार दिवसांत पिकविला जातो. या आंब्यावर सुरकुती न पडता तो चमकदार दिसतो. त्यामुळे ग्राहक आकर्षित होतात व फसतात. डागविरहित दिसणारा हा आंबा आतून खराब निघण्याचे प्रमाण कमी असते. त्यामुळे आंब्याची विक्री व्यापाऱ्यांकरिता अधिक सोयीचे ठरते.
हापूसच्या नावाने कर्नाटकी आंबा
By admin | Published: April 14, 2017 3:35 AM