‘कर्नाळ्याच्या’ सुळक्याला चिरा
By admin | Published: July 10, 2015 03:12 AM2015-07-10T03:12:33+5:302015-07-10T03:12:33+5:30
ऐतिहासिक कर्नाळा किल्ल्याच्या सुळक्याला चिरा पडत आहेत. त्यामुळे किल्ल्याच्या भक्कमपणापुढे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
वैभव गायकर, पनवेल
ऐतिहासिक कर्नाळा किल्ल्याच्या सुळक्याला चिरा पडत आहेत. त्यामुळे किल्ल्याच्या भक्कमपणापुढे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
किल्ल्याचे प्रवेशद्वार ढासळले आहे तसेच तटबंदी देखील कोसळत चालली आहे. सुळक्याच्या पायथ्याशी १२ पाण्याचे हौद व धान्याची कोठारे आहेत. यापैकी एका हौदाचा वापर पिण्याच्या पाण्यासाठी केला जातो.
किल्ल्याच्या संवर्धनासाठी शासनाकडून योग्य उपाययोजना आजवर होताना दिसून आलेल्या नाहीत. याठिकाणी प्रसिद्ध असलेल्या पक्षी अभयारण्यात पर्यटनप्रेमींपेक्षा संख्या दिवसेंदिवस वाढत आह. कर्नाळा किल्ल्याचे ऐतिहासीक महत्व पाहता याठिकाणच्या बुरुजाच्या संवर्धनासाठी शासनाने तत्काळ पावले उचलावीत यासाठी मी शासनाच्या संबधीत खात्याशी पत्रव्यवहार करणार असल्याचे गडकिल्ले अभ्यासक विजय खिल्लारे यांनी सांगितले.
पनवेल व बोर घाटातून मुंबई व चौल बंदराकडे होणाऱ्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग होत होता. देवगिरी यादवांचे १२४८ ते १३१८ पर्यंत राज्य होते. ऐतिहासिकदृष्ट्या हा किल्ला महत्त्वाचा आहे.