काेराेना पॉझिटिव्हिटी दर वाढला, दुसरी लाट आली म्हणता येणार नाही - काकाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2021 01:54 AM2021-02-18T01:54:25+5:302021-02-18T01:54:56+5:30

Corona Virus News : सध्या मुंबईचा पॉझिटिव्हिटी दर चार टक्के आहे. यापूर्वी तो कमी होऊन गेल्या महिन्यात तीन टक्के होता.

Carona positivity rate increased, another wave cannot be said to have come - Kakani | काेराेना पॉझिटिव्हिटी दर वाढला, दुसरी लाट आली म्हणता येणार नाही - काकाणी

काेराेना पॉझिटिव्हिटी दर वाढला, दुसरी लाट आली म्हणता येणार नाही - काकाणी

googlenewsNext

मुंबई : मागील काही दिवसांपासून शहर, उपनगरात पुन्हा कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. परिणामी, पॉझिटिव्हिटी दरही वाढल्याने वैद्यकीय तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली. सध्या मुंबईचा पॉझिटिव्हिटी दर चार टक्के आहे. यापूर्वी तो कमी होऊन गेल्या महिन्यात तीन टक्के होता.
शहर, उपनगरात दिवसाला जवळपास १५ हजार कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. २२ जानेवारी रोजी पॉझिटिव्हिटी दर तीन टक्क्यांपर्यंत घसरला होता. मात्र मागील ५-६ दिवसांपासून ताे वाढला
पालिकेचे अतिरिक्त आय़ुक्त सुरेश काकाणी म्हणाले, मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे सामान्यांकडून पालन होताना दिसत नाही. मास्क, सॅनिटायजरचा वापर काहीसा कमी झाला आहे. येत्या दिवसांत याविषयीचे नियम कठोर करण्यात येतील. रुग्णसंख्येतील वाढ ही कोरोनाची दुसरी लाट असल्याचे म्हणता येणार नाही.

सामान्यांसाठी लाेकल सुरू झाली हे एकच कारण नाही!
पालिकेच्या सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी म्हणाले, सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू झाल्याने रुग्णसंख्या वाढली हे केवळ एकमेव कारण नाही. त्यासाठी विविध बाबींचे विश्लेषण व अभ्यास होणे गरजेचे आहे. याशिवाय, शारीरिक अंतर, स्वच्छता आणि मास्कचा वापर याविषयी समान्यांमध्ये गांभीर्य दिसून येत नाही, त्याकडे लक्ष दिले पाहिजे. तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण प्रक्रिया लवकर सुरू करण्यावर भर दिला पाहिजे.

Web Title: Carona positivity rate increased, another wave cannot be said to have come - Kakani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.