मालाड पुलाच्या दुरुस्तीपत्राला पालिकेकडून ९ वेळा केराची टोपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 01:21 AM2018-08-03T01:21:25+5:302018-08-03T01:21:33+5:30

अंधेरी पूल दुर्घटनेनंतर तातडीने मालाड येथील पूल बंद करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वे आणि पालिकेने घेतला. मात्र या पुलाच्या दुरुस्तीसाठी १२ आॅगस्ट २०१६पासून पश्चिम रेल्वे पालिकेकडे पाठपुरावा करत असून त्याला यश आलेले नाही.

 A carpet basket of 9 times by the Municipal Commissioner for Malad bridge | मालाड पुलाच्या दुरुस्तीपत्राला पालिकेकडून ९ वेळा केराची टोपली

मालाड पुलाच्या दुरुस्तीपत्राला पालिकेकडून ९ वेळा केराची टोपली

Next

- महेश चेमटे

मुंबई : अंधेरी पूल दुर्घटनेनंतर तातडीने मालाड येथील पूल बंद करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वे आणि पालिकेने घेतला. मात्र या पुलाच्या दुरुस्तीसाठी १२ आॅगस्ट २०१६पासून पश्चिम रेल्वे पालिकेकडे पाठपुरावा करत असून त्याला यश आलेले नाही. मालाड पूल दुरुस्तीसाठी पश्चिम रेल्वे, पालिका प्रशासनात तब्बल ९ वेळा पत्रव्यवहार झाला. मात्र दोन्ही प्रशासनाच्या अकार्यक्षमतेमुळे दुरुस्ती रखडली. त्यामुळे दोन वर्षांपासून मुंबईकरांचा प्रवास धोकादयक झाला आहे.
मालाड पश्चिमेकडील स्कायवॉकच्या पुनर्बांधणीसाठी ५ कोटी ४५ लाख १३ हजारांचा खर्च असल्याची माहिती रेल्वेने पालिकेला दिली. याबाबत पहिले पत्र रेल्वेने १२ आॅगस्ट २०१६ रोजी लिहिले. त्याची पालिकेने दखल न घेतल्याने १७ आॅक्टोबर २०१६, ११ नोव्हेंबर २०१६, ५ जानेवारी २०१७, २३ जानेवारी २०१७ आणि २० जून २०१७ रोजी पत्रे पाठवली. मात्र प्रतिसाद मिळाला नसल्याचे रेल्वोचे म्हणणे आहे.
अंधेरी दुर्घटनेनंतर मालाड प्रकरणी रेल्वेने २०, २६ जुलै रोजी पालिकेला दुरुस्तीसाठी पैसे भरण्यास पत्रे पाठवली आहेत. पश्चिम रेल्वेने पैसे मिळाल्याशिवाय पुलाची दुरुस्ती न करण्याचा निर्णय घेतला आहे. तर पुलांच्या पैशांबाबत पालिकेने भूमिका स्पष्ट केलेली नाही. पालिकेच्या संबंधित विभागाशी संपर्क साधला असता, कोणताही अधिकारी ‘आॅन रेकॉर्ड’ बोलण्यास तयार नाही. (उत्तरार्ध)

येथील कामेही लटकलेलीच!
दुर्घटनाग्रस्त अंधेरी पुलालगत असलेल्या पाइपलाइन पुलाच्या कामासाठी २१ नोव्हेंबर २०१७ रोजी रेल्वेने पत्र लिहिले होते. मात्र
दुरुस्तीचे काम लटकल्याने अखेर
१९ जुलै २०१८ रोजी या पुलाचा भाग निखळला होता. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.
गोरेगाव-मालाडदरम्यान पादचारी पुलाच्या कामासाठीदेखील २६ मे २०१७पासून दुरुस्तीसाठी पाठपुरावा करण्यात येत होता. मात्र अद्यापही पुलाची दुरुस्ती झाली नसल्याचे स्पष्टीकरण रेल्वे प्रशासनाने दिले आहे.

Web Title:  A carpet basket of 9 times by the Municipal Commissioner for Malad bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई