Join us

मिठी नदीची वहन क्षमता तिपटीने वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2020 3:35 AM

मिठी नदीचा उगम विहार व पवई जलाशयाच्या प्रवाहातून होत असून, मिठी नदीची लांबी १७.८४ किमी आहे. मिठी नदी सीप्झ, मरोळ, अंधेरी, आंतरराष्ट्रीय विमानतळाची धावपट्टीखालून वाहते.

मुंबई : मिठी नदीचे खोलीकरण, रुंदीकरण, खडक खोदाई, संरक्षक भिंत, सर्व्हिस रोड, सुशोभीकरणाची कामे या कामांपैकी बहुतांशी कामे पूर्ण झाली असून, त्यामुळे नदीच्या वहन क्षमतेत तिपटीने वाढ झाल्याचा दावा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने केला आहे. दरम्यान, आता मिठी नदी अधिकाधिक स्वच्छ करण्यावर भर दिला जात आहे.मिठी नदीचा उगम विहार व पवई जलाशयाच्या प्रवाहातून होत असून, मिठी नदीची लांबी १७.८४ किमी आहे. मिठी नदी सीप्झ, मरोळ, अंधेरी, आंतरराष्ट्रीय विमानतळाची धावपट्टीखालून वाहते. त्यानंतर बैलबाजार, कुर्ला, वांद्रे-कुर्ला संकुलातून माहिम खाडीद्वारे १५ पुलांच्या खालून वाहत अरबी समुद्राला मिळते. मिठी नदीचे पाणलोट क्षेत्र ७ हजार २९५ हेक्टर आहे. उगम स्थानी ती समुद्रसपाटीपासून २४६ मीटर उंच आहे. मिठी एकूण १७.८४ किमी लांब असून, याप्.ौकी ११.८४ किमी लांबीचा भाग हा मुंबई महापालिकेच्या अधिपत्याखाली तर ६ किलोमीटर लांबीचा भाग हा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अखत्यारीत आहे. हा ६ किमी भाग भरतीच्या प्रवाहा अंतर्गत येतो.१ आॅगस्ट २००० रोजी मिठी नदी विकास व संरक्षण प्राधिकरणस्थापन करण्यात आले. मात्रअद्याप समाधानकारक काम झाले नाही. मिठी नदीच्या प्रकल्पावर आतापर्यंत १ हजार ४०० कोटी रुपये खर्च झाले आहेत.साफसफाईवर आजही उभे केले जातात प्रश्नकंत्राटी कालावधीदरम्यान मिठी नदीतून सुमारे १ लाख ३८ हजार ८३० मेट्रिक टन एवढा गाळ उपसण्याचे लक्ष्य असते. यापैकी बहुतांशी गाळ हा पावसाळ्यापूर्वी काढला जातो, असा दावा महापालिकेचा आहे.आजही मिठी नदीच्या साफसफाईवर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे. विशेषत: याकामी मिळालेला निधी मिठी नदीच्या गाळातच रुतल्याचे चित्र आहे. २०१० मध्येच हा प्रकल्प पाच वर्षांत पूर्ण होणार होता. मात्र निम्मे कामदेखील झालेले नाही.

टॅग्स :मुंबईनदी