गाड्या सोडतात धूर,तर मुंबईकर झालेत बेफिकीर; गेल्या वर्षी आढळली तीन हजार पीयूसीविना वाहने

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 01:03 PM2023-05-24T13:03:16+5:302023-05-24T13:03:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पीयूसी नसेल तर नियमभंग मानून कारवाई होऊ शकते. वाहन तपासणी करून पीयूसी प्रमाणपत्र देण्याकरिता ...

Cars release smoke, Mumbaikars become careless; Three thousand vehicles without PUC were found last year | गाड्या सोडतात धूर,तर मुंबईकर झालेत बेफिकीर; गेल्या वर्षी आढळली तीन हजार पीयूसीविना वाहने

गाड्या सोडतात धूर,तर मुंबईकर झालेत बेफिकीर; गेल्या वर्षी आढळली तीन हजार पीयूसीविना वाहने

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पीयूसी नसेल तर नियमभंग मानून कारवाई होऊ शकते. वाहन तपासणी करून पीयूसी प्रमाणपत्र देण्याकरिता मुंबईत पीयूसी सेंटर कार्यरत आहे. मात्र, अनेक वाहनधारक वेळोवेळी वाहन तपासणी करत नाही व पीयूसी प्रमाणपत्र सोबत बाळगत नाही. मुंबईत २९७३ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. मुंबईत गेल्यावर्षी ८५०० वाहनांची तपासणी करण्यात आली, त्यामध्ये २९७३ वाहने दोषी आढळली असून त्यांच्याकडून ४० लाख ८८ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. मोटार वाहन कायद्यानुसार सध्या वाहनांना पीयूसी प्रमाणपत्र बंधनकारक आहे. वाहन तपासणीमुळे वाहन किती प्रदूषण करते हे लक्षात येते.

प्रदूषण रोखण्यासाठी वाहनांना पीयूसी प्रमाणपत्र आवश्यक असते. हे प्रमाणपत्र काढण्यासाठी ५० रुपये खर्च येतो. विना पीयूसी वाहने प्रादेशिक परिवहन विभाग भरारी पथकाच्या निदर्शनास आल्यास ५० रुपयाच्या पीयूसीसाठी किमान २ ते ४ हजार रुपयांचा दंड आकारला जातो. दुचाकी, तीनचाकी, चारचाकीपेट्रोल, डिझेल वा सीएनजी संवर्गातील वाहन पीयूसी नसताना तपासणी मोहिमेत आढळल्यास चालक आणि मालक यांना दंड  जातो. 

पीयूसी प्रमाणपत्र हवे
एखाद्या वाहनाचा अपघात झाला आणि संबंधित वाहन मालकाकडे वाहन तपासणी पीयूसी प्रमाणपत्र नसेल तर विमा नाकारला जाऊ शकतो. यामुळे पीयूसी करून घ्यावे असे आवाहन चालकांना करण्यात आले आहे.

Web Title: Cars release smoke, Mumbaikars become careless; Three thousand vehicles without PUC were found last year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.