Join us

गाड्या सोडतात धूर,तर मुंबईकर झालेत बेफिकीर; गेल्या वर्षी आढळली तीन हजार पीयूसीविना वाहने

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 1:03 PM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पीयूसी नसेल तर नियमभंग मानून कारवाई होऊ शकते. वाहन तपासणी करून पीयूसी प्रमाणपत्र देण्याकरिता ...

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पीयूसी नसेल तर नियमभंग मानून कारवाई होऊ शकते. वाहन तपासणी करून पीयूसी प्रमाणपत्र देण्याकरिता मुंबईत पीयूसी सेंटर कार्यरत आहे. मात्र, अनेक वाहनधारक वेळोवेळी वाहन तपासणी करत नाही व पीयूसी प्रमाणपत्र सोबत बाळगत नाही. मुंबईत २९७३ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. मुंबईत गेल्यावर्षी ८५०० वाहनांची तपासणी करण्यात आली, त्यामध्ये २९७३ वाहने दोषी आढळली असून त्यांच्याकडून ४० लाख ८८ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. मोटार वाहन कायद्यानुसार सध्या वाहनांना पीयूसी प्रमाणपत्र बंधनकारक आहे. वाहन तपासणीमुळे वाहन किती प्रदूषण करते हे लक्षात येते.

प्रदूषण रोखण्यासाठी वाहनांना पीयूसी प्रमाणपत्र आवश्यक असते. हे प्रमाणपत्र काढण्यासाठी ५० रुपये खर्च येतो. विना पीयूसी वाहने प्रादेशिक परिवहन विभाग भरारी पथकाच्या निदर्शनास आल्यास ५० रुपयाच्या पीयूसीसाठी किमान २ ते ४ हजार रुपयांचा दंड आकारला जातो. दुचाकी, तीनचाकी, चारचाकीपेट्रोल, डिझेल वा सीएनजी संवर्गातील वाहन पीयूसी नसताना तपासणी मोहिमेत आढळल्यास चालक आणि मालक यांना दंड  जातो. 

पीयूसी प्रमाणपत्र हवेएखाद्या वाहनाचा अपघात झाला आणि संबंधित वाहन मालकाकडे वाहन तपासणी पीयूसी प्रमाणपत्र नसेल तर विमा नाकारला जाऊ शकतो. यामुळे पीयूसी करून घ्यावे असे आवाहन चालकांना करण्यात आले आहे.