Join us

कार्टून, इतिहास आणि भाजप-सेनेत कलगीतुरा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2022 6:33 AM

भाजपच्या आधीपासून शिवसेना ताकदवान होती, याला पुरावा म्हणून संजय राऊत यांनी आर. के. लक्ष्मण यांचे जुने व्यंगचित्र ट्विट केले. त्याला कोण कोणामुळे वाढले, बघा नीट, असा मथळाही दिला होता.

गौरीशंकर घाळेमुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनापासून शिवसेना आणि भाजपमध्ये सुरू झालेला कलगीतुरा अद्याप सुरू आहे. सध्या कोणाचे नगरसेवक, आमदार आधी निवडून आले या वादापासून खा. संजय राऊत यांनी ट्विट केलेल्या व्यंगचित्रावर खा. पूनम महाजन यांनी लगावलेल्या टोल्यापर्यंत एकमेकांवर कुरघोडीचा प्रयत्न सुरू आहे.

भाजपच्या आधीपासून शिवसेना ताकदवान होती, याला पुरावा म्हणून संजय राऊत यांनी आर. के. लक्ष्मण यांचे जुने व्यंगचित्र ट्विट केले. त्याला कोण कोणामुळे वाढले, बघा नीट, असा मथळाही दिला होता. या व्यंगचित्रात एका खुर्चीवर बसलेले बाळासाहेब समोरच्या खुर्चीवरही पाय ठेवून आहेत आणि प्रमोद महाजन यांना ‘या, बसा’ म्हणत आहेत, असे दर्शविण्यात आले होते. यातून त्याकाळी युतीत शिवसेना किती ताकदवान आणि भाजप कसा कमकुवत आहे, हे रेखाटले होते. संजय राऊत यांनी ट्विट केलेल्या या व्यंगचित्रावर प्रमोद महाजन यांच्या कन्या आणि भाजप खा. पूनम महाजन यांनी जोरदार आक्षेप घेतला. ‘स्वर्गीय बाळासाहेब व स्वर्गीय प्रमोदजी, या दोन मर्दांनी हिंदुत्वासाठी युती केली होती. नामर्दांसारखे कार्टून दाखवू नका,’ अशा कडक शब्दात महाजन यांनी राऊत यांना सुनावले होते. त्यानंतर राऊत यांनी ट्विट डिलिट केले. मात्र, आपण प्रमोद महाजन यांच्यावर व्यक्तिगट टीका केली नव्हती. पूनम महाजन यांना अस्वस्थ होण्याचे कारण नव्हते असे राऊत म्हणाले.

त्यांच्या इतिहासातील पाने कोणी तरी फाडलीवाजपेयी, अडवाणी, महाजन यांच्या सारख्या मोठ्या नेत्यांनी ही युती घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली; भाजपच्या नव हिंदुत्ववादी नेत्यांना माहीत नाही. त्यांच्या इतिहासातील काही पाने कोणी तरी फाडली आहेत, असे राऊत म्हणाले.

टॅग्स :देवेंद्र फडणवीसशिवसेनाउद्धव ठाकरे