गाडी रद्द झाल्यास प्रवाशांना एसएमएस

By admin | Published: June 27, 2015 11:13 PM2015-06-27T23:13:44+5:302015-06-27T23:13:44+5:30

प्रवासापूर्वी लांब पल्ल्याची रेल्वे रद्द झाल्यास त्याचा एसएमएस प्रवाशाच्या मोबाईलवर पाठविण्याची सुविधा रेल्वेने सुरू केली आहे.

In case of cancellation of train, SMS to passengers | गाडी रद्द झाल्यास प्रवाशांना एसएमएस

गाडी रद्द झाल्यास प्रवाशांना एसएमएस

Next

डोंबिवली : प्रवासापूर्वी लांब पल्ल्याची रेल्वे रद्द झाल्यास त्याचा एसएमएस प्रवाशाच्या मोबाईलवर पाठविण्याची सुविधा रेल्वेने सुरू केली आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांना ते ज्या गाडीने प्रवास करणार आहेत ती ऐनवेळी रद्द झाल्यास त्याची माहिती मिळणार आहे. सध्या प्रायोगिक स्वरुपात ही सुविधा सुरू केली आहे. तूर्तास तरी ही सुविधा केवळ लांबपल्याच्या गाड्यांसाठी असून उपनगरीय प्रवाशांना त्याचा लाभ मिळणार नाही.
रेल्वेगाडी रद्द झाली की नाही, याची माहिती न मिळाल्याने प्रवाशांना अनेक असुविधांना सामोरे जावे लागू नये, यासाठी ही सुविधा सुरू केली आहे. संबंधित गाडी ज्या स्थानकातून सुटणार आहे तेथून ज्यांनी आरक्षण केले आहे, त्या प्रवाशांनाच ही एसएमएस सुविधा मिळणार आहे. लवकरच प्रवासाच्या दरम्यान येणाऱ्या इतर स्थानकावरून आरक्षण केलेल्या प्रवाशांनाही असा एसएमएस पाठविण्यात येईल असे रेल्वेच्या वाणिज्य विभागाने सांगितले. रेल्वे रद्द झाल्यानंतर शक्य तितक्या लवकर प्रवाशांना ही माहिती दिली जाईल.

Web Title: In case of cancellation of train, SMS to passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.